*विशेष-प्रतिनिधी--राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित व रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज संचलित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन फोंडशिरस (ता. माळशिरस) येथे करण्यात आले. यादरम्यान महाविद्यालयाची 'कृषिदूत' आदित्य कारकले ह्याने शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. पीक उत्पन्नात मोठी घट होत असून यामुळे जमिनी नापीक होत चालल्या असून यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीत कोणते घटक कमी व जास्त आहेत याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक बिरादार,रोहित शिंदे, गणेश सुरवसे,अली शेख, करण जाधव, अजिंक्य कांबळे, तानाजी बिराजदार, आदित्य कारकले यांनी केले होते.यावेळी अक्षय सुभाष शेंडे, बापू शेवते, तात्या काळे, सुखा मुंडे आदीसह शेतकरी उपस्थित होते. यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुर, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एस. आर. अडत , यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रतिक बिरादार यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा