*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
धाराशिव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील आॕनलाईन ई पाॕज मशीन बंद असल्याने
दि.31/7/2024 रोजी धाराशिव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना "लाडकी बहिण उपाशी" असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी निवेदन देण्यात आले आणि या ई पाॕज मशीन अभावी उपाशी असलेल्या "लाडक्या बहिणी"धान्य वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा 'शिवसेना -उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे
इ पॉज मशीन चे सर्वरवारंवार डाऊन होत असल्यामुळे ऑनलाइन धान्य देण्यास स्वस्त धान्य दुकानदार असमर्थता दाखवतात त्यामुळे जे धान्याचे लाभार्थी आहेत ते धान्यापासून वंचित राहतात त्यामुळे ऑनलाइन नोंदणीची वाट न पाहता ऑफलाइन धान्य वाटप करावे जेणेकरून लाभार्थी त्यापासून वंचित राहणार नाहीत आणि ऑनलाइन अभावी त्या महिन्यात लाभार्थ्याला धान्य उपलब्ध नाही झाले तर दुसऱ्या महिन्यात स्वस्त धान्य दुकानदार ते धान्य लाभार्थ्याला देत नाहीत त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने ध्यान धान्य द्यावे असे ही म्हटले आहे
या प्रसंगी तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक- राहुल भैय्या खपले, नवनाथ आप्पा जगताप, गणेश छत्रे, अमोल जाधव ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा