**उपसंपादक ...नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत" अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र महाळुंग यांच्या 7 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली प्रारंभी स्वंयप्रभादेवी मोहिते पाटील व वैष्णवीदेवी मोहितृ पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, करण्यात आले
उत्कृष्ट बचत गटांना बक्षीस वितरण स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील व वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदा फुले ,अरुण तोडकर, जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंटे महाळुंग नगरपंचायत चे नगरसेवक -रतनसिंह रजपूत, नगरसेविका- ज्योत्सना सावंत पाटील , शारदाताई पाटील, उमा वाळके, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे , तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव , अस्मिता लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा- जयश्रीताई बाबर , व्यवस्थापक महेश लाळगे साधन केंद्राच्या सर्व कार्यकारी सदस्या, बचत गटांच्या महिला, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा