*सांगली---पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला
आम्ही म्हणजेच मी, माझा मुलगा सुहेब ' आणि सामाजिक क्षेत्रात लक्ष्यवेधी कामगिरी 'करणारे प्रख्यात युवा उद्योगपती अलबतीन जब्बार बारसकर आम्ही संयुक्तरित्या तब्बल 370 झाडें लावून "निसर्गाचा" समतोल राखण्यासाठी "आदर्शवत" कार्य केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात सर्व सामाजिक संघटनांनी दरवर्षी कमाल 5000 झाडें लावून , ती जगवण्याचा "संकल्प" आणि निर्धार करायला हवा.
छ.शिवाजी रोड ,सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे झाडांची "कत्तल" !
मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रोडवर सुप्रसिद्ध असणाऱ्या हॉटेल जायका समोर असणाऱ्या "100 वर्ष" पूर्ण झालेल्या झाडाची "कत्तल" करण्यात आली . रस्ता रुंदीकरणसाठी झाडें तोडता मग त्याबदल्यात या रोडवर किती झाडें लावली गेली ??? या रोडवरील मिशन हॉस्पिटल ते एस.टी .स्टॅन्ड पर्यंत कित्येक झाडें तोडली आहेत. जेथे शेकडो पक्षी आणि त्यांची पिले घरट्यात राहत होती. "वृक्षतोडमुळे" पक्ष्यांचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे .
सांगलीतदेखील सिव्हिल हॉस्पिटल चौकात सुशोभीकरण च्या नावाखाली मोठमोठी 4 झाडें तोडण्यात आली आहेत . परंतु त्या जागेजवळ एकही नव्याने झाड लावण्यात आले नाही .झाडांची होणारी कत्तल आणि निसर्गाचा होणारा असमतोल - ऱ्हास यामुळे ऑक्सिजन ची होणारी कमतरता निर्माण होते .यामुळेच झाडे लावणे ती "जगवणे" 21 व्या शतकात अत्यावश्यक ठरले आहे .
एक झाड दरवर्षी 30 लाख रुपयांचे ऑक्सिजन देते !
आपणास आश्चर्य वाटेल,एक झाड दरवर्षी 30 लाख ऑक्सिजन चे उत्कर्षन ,मातीची धूप कमी करने , रुपयांचे "ऑक्सिजन" देते. माती खतयुक्त करणे,पाण्याची पुनर्प्रक्रिया करणे,पाणी "शुद्ध" करणे, .एक निरोगी वृक्ष जेवढा ऑक्सिजन देते,त्याचा विचार करता 50 वर्षात त्याची किंमत 30 लाख रुपये इतकी होते.
वृक्षतोड झाल्यास पुराची शक्यता 28% ने वाढते .
सांगली सह महाराष्ट्रातील कित्येक शहरांना पुराचा "धोका" असतो. परंतु हा धोका निश्चितपणे कमी करू शकतो .झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड हा सर्वोत्तम उपाय आहे . जगातील 56 देशांचा अभ्यास केला असता,ज्या देशांनी "वृक्षतोड" केली तेथे पुराचा धोका कमालीचा वाढला. आणि धक्कादायक रित्या 28 % ने हें प्रमाण वाढले. ज्या शहरात वृक्ष मुबलक आहेत तेथे पूर कमी आल्याचे आणि तेथे पुराचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे .
झाडांमुळे दम्याचे प्रमाण 33% ने कमी होते. "डास" घरात न येता डास झाडावरचं बसतात !
झाडामध्ये असणाऱ्या ऑक्सिजन मुळे मनुष्याला होणाऱ्या दम्याचे प्रमाण 33% ने कमी होते. ब्रिटनमध्ये झालेल्या प्रयोगातून हें सिद्ध झाले आहे .रस्त्यावर झाडें लावल्यावर मलेरिया निर्माण करणारे डास हें झाडावर थांबतात. झाडें नसतील तर ते प्रत्यक्षात मोठ्याप्रमाणात घरात येतात. व मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतो .
दूषित पर्यावरणामुळे जगात 9% मृत्यू रोखू शकतो !
दूषित हवेच्या प्रदूषणामुळे गंभीर आजार उध्दभवतात.परंतु आपण लावलेले एक झाड दरवर्षी 20 किलो धूळ शोषून घेत असते .आणि आपल्याला निरोगी बनवत असते .पर्यावरणासाठी उपयुक्त असणारे शेकडो झाडें पर्यावरणचा समतोल राखू शकतात .जर प्रत्येक शहरात, दरवर्षी 5000 झाडें लावण्याचा संकल्प केला गेला तर आगामी पिढीसाठी हें आरोग्यदायी आणि उपकारक ठरणार आहे .एक झाड 700 किलो ऑक्सिजन देते !
सर्वसाधारणपणे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वाशोश्वास करावा लागतो . मनुष्य ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही . एका व्यक्तीला एका वर्षात 740 किलो ऑक्सिजन लागतो. झाडांच्या सानिध्यात मनुष्य असेल तर त्याला मोफत झाडांचे ऑक्सिजन मिळू शकतो .
एक झाड 3500 लिटर पावसाचे पाणी पाडते. सर्वसाधारणपणे सर्वाधिक झाडे असणाऱ्या परिसरात -शहरात पाऊस जास्त पडतो .याचे कारण काय असावे ?? वास्तविक एक झाड 3500 लिटर पाणी देते . शिवाय 3700 लिटर पाणी "भूगर्भात" अर्थात त्यामुळे जमिनीत मुरवते .अर्थात त्यामुळेच जमिनीची पाणीपातळी वाढते .
झाडांमुळे A.C ची गरज 30% ने कमी होते* .
उष्णतेमुळे विजेची मागणी वाढते . आर्थिक खर्च वाढतो. परंतु आजूबाजूच्या परिसरात झाडांची संख्या जास्त असेल तर A.C.लावण्याचे प्रमाण 30% ने कमी होते . हवा खेळती असेल तर विजेची बचत ही होते . त्याशिवाय झाडांमुळे गोंगाटाचे प्रमाण ही 50% ने कमी होऊ शकते . झाडांच्या पानातूनही "बाष्पीभवन": होते . पाण्याची वाफ बनते , जलस्त्रोत्रातून,अर्थात नदी - समुद्रातून बाष्पीभवन होते ,यामुळे हवेतील आद्रता वाढते ,मोठे वृक्ष हवेतील आद्रता रोखतात ,यामुळे जास्त पाऊस पडतो व झाडें कार्बनडाईक्सड शोषून घेतात.
सर्व नागरिकांनी झाडे लावण्याचा निर्धार करावा ही नम्र विनंती !
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
(*पत्रकार*)
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा