Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २ जुलै, २०२४

*अकलूज पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक "भानुदास निंभोरे" यांनी पञकार ,पोलिस पाटील,ज्येष्ठ नागरिक ,यांना केले नविन 3 कायद्याबाबात मार्गदर्शन* *

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

भारतात ब्रिटीश राजवटीत अधिनियीमत केलेले प्रमुख तीन कायदे १) भारतीय दंड संहिता १८६०, २) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३, ३) साक्षी पुरावा अधिनियम कायदा १८७२ हे कायदे होते. त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या, तरी देखील कायदा व सुव्यवस्था मजबुत करण्यासाठी या कायदयाचे पुनरावलोकन करून सर्वसामान्य माणसाला चांगले जीवनीकरीता व अन्यायग्रस्त व्यक्तींना व आरोपींना जलद न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने नवीन कायदे करण्याचा निर्णय


केंद्र सरकारने घेतला. त्या तीन प्रमुख कायदयामध्ये बदल झालेला आहे. १) भारतीय दंड संहिता १८६० (IPC) ऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS),


२) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ (CRPC) ऐवजी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS)


३) साक्षी पुरावा अधिनियम कायदा १८७२ (IEA) ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ (BSA)


असे तीन कायदे केंद्र सरकारच्या गृह मंत्रायलयाने दिनांक ०४/०५/२०२० रोजी अधिसुचना काढून सदर कायदयाचे संहितेचे पुनवरालोकन करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.डॉ. रणवीर सिंग यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमुण समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांशी विचारविनियम करुन भारतातील न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी शिफारशीचा अहवाल केंद्र शासनाला दिनांक २७/०२/२०२२ रोजी सादर करण्यात आला व त्या अनुषंगाने वरील तीन कायदे निर्षीत करून नवीन कायदे आणण्याचा निर्णय घेवून तसे विधेयक आणुन आता भारतामध्ये तयार झालेले संपुर्ण भारतीय असलेले कायदे भारतात अंमलबजावणीसाठी दिनांक २३/०२/२०२४ रोजी अधिसुचना करून आज दिनांक ०१/०७/२०२४ रोजीपासून वरील तीन नवीन कायदे लागू झाले असून त्या प्रमाणे अंमलबजावणी सुरु झाली आहे.


१) भारतीय दंड संहिता १८६० (IPC) यामध्ये ५११ कलमे होती ती भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) मध्ये ३५८ झाली आहेत,


२) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ (CRPC) यामध्ये ४८४ कलमे होती ती भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS) मध्ये ५३१ झाली आहेत,


३) साक्षी पुरावा अधिनियम कायदा १८७२ (IEA) यामध्ये १६७ होती ती भारतीय साक्ष अधिनियम २०२३ (BSA) मध्ये १७० झाली आहेत जन


सदर कायदयाची समाजामध्ये जागृती व्हावी याकरीता अकलुज पोलीस ठाणे येथे पत्रकार बांधव, पोलीस पाटील, जेष्ठ नागरीक, प्रतिष्ठीत व्यक्ती यांची बैठक घेवून पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी त्यांना नवीन कायदयांबाबत माहिती दिली.


पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा