Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

*तुळजाभवानी साखर कारखान्याने 10 ऑगस्टपर्यंत बिले न दिल्यास "गनिमी कावा पध्दती" ने आंदोलन करणार--- अमोल जाधव*

 


*मुख्यसंपादक ---हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448

तुळजाभवानी साखर कारखाना मर्यादित नळदृर्ग लि गोकुळ शुगर इन्स्टिट्यूट धोत्री यांनी भाडे तत्वा वर चालवायला घेतला आहे सन

2023/ 2024 चे राहीलेली शेतकऱ्यांची बिले व कर्मचाऱ्यांच्या पगारी देण्यात यावे या करिता 



दिनांक 1 आॕगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता तुळजापूर येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन कर्ते अमोल शिवाजी जाधव व नगरसेवक राहुल भैय्या खपले यांच्या उपस्थितीत "भिक मागु आंदोलन" करण्यात आले या भीक मांगो आंदोलनात जमा झालेल्या पैशातून साडी चोळी घेण्यासाठी



 धाराशिवचे पालकमंत्री, जिल्हा अधिकारी, तहसीलदार, तुळजापूर तालुक्याचे आमदार, डि डि आर ऐ आर ,माजी आमदार ,कारखाना कार्यकारी संचालक यांना मनी ऑर्डर करणार असल्याचे सांगून येत्या 10 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्याची बिले आणि कर्मचाऱ्यांची पगारी न केल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार वरील सर्व मान्यवर राहतील असा इशारा आंदोलन कर्ते अमोल जाधव यांनी दिला असून याप्रसंगी तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक राहुल भैया खपले, नवनाथ आप्पा जगताप ,राज खपले ,शरद जगदाळे ,शेतकरी- सतीश आडे ,महेश कोळेकर, अंकुश कोकरे ,विजू नाईक ननवरे, संतोष गाडे ,अर्जुन कोळेकर, संदेश माने, चेतन गोरे, (बेलकुंड) अंगद पोपट इंगळे, अजित तांबे ,दगडू पटेल ,अजित क्षीरसागर ,धुळाजी कोळेकर, संजय देशमुख ,योगेश शिंदे, अण्णा गाडे ,अमित कोकरे, अमोल वसंत कोरेकरा ,मोहन कोरेकर, शकील मुलाणी ,तसेच शेतकरी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा