*प्रतिनिधी--केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख वक्ते प्रा.अजित लोकरे यांनी दोन्ही विभुतींच्या कार्याचा गुणगौरव करणारे भाषण केले. महान व्यक्तींवर टीका झाली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची कमी होत नसल्याचे लोकमान्य टिळकांविषयी बोलताना ते म्हणाले.तर अण्णा भाऊ यांच्याविषयी बोलताना त्यांनी अण्णा भाऊ यांनी रशियात भारताचे नाव पोहचविल्याचे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांची पूजा करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास विभागाने कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा.श्रीमती गुलनास मुजावर यांनी सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले.याप्रसंगी प्रा.एस.डी.रक्ताडे, प्रा.संजय जाधव-कामेरिकर, ग्रंथपाल विशाल शेवाळे आणि सेवक तानाजी मोहिते आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा