Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

*बदलापूर घटनेतील आरोपीला "फाशीची शिक्षा" व्हावी महिलांची व मुलींची आर्त हाक*


 

*सांगली----पञकार*

*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

 *मो;--8983 587 160*

मुंबई जवळील बदलापूर मध्ये "भाजपचे" हितचिंतक असणाऱ्या आदर्श शाळेमध्ये माणुसकीला काळिमा  फासत , "कोर्याची परिसीमा" गाठत , दोन चिमुरडीवर अक्षय शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची "निंदनीय" घटना घडली.

 बलात्कार  किंवा अत्याचार  करणाऱ्यांचा कोणताच धर्म नसतो .तो हिंदू , मुस्लिम, ब्राम्हण, गुजराथी* किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असू शकतो. त्यामुळे बलात्कार करणाऱ्या आरोपीला    कोणतीही "दयामाया" न दाखवता फाशीची  शिक्षाच द्यायला हवी. दुसरा मुद्दा हा की बदलापूर मध्ये घडलेल्या बलात्काच्या बातमीमध्ये एक

पुढारीपणा गाजवणाऱ्या वृत्तपत्रात अक्षय शिंदे याचे नावं व फोटो* मोठ्या "ठळक" स्वरूपात का आले नाही ??? अक्षय च्या ऐवजी आज एखादा मुस्लिम तरुण असता तर त्याचा फोटो  व "नावं" नेहमीप्रमाणे आजच्या वर्तमानपत्रात ठळकपणे छापून  आले असते. 



समस्त मुस्लिमांना  संशयाच्या भोवऱ्यात आणणाऱ्या या वृत्तपत्राचे खरे  जातीयवादी  रूप  पुन्हा एकदा आज दिसून आले आहे. अतिरेकी किंवा बलात्कार करणारे सर्व सारखेच असतात.  त्यांचा कोणताही धर्म नसतो. आणि हो, हा तरुण अक्षय शिंदे आहे ..तो शेख ,पटवेगार किंवा बागवान  नाही, तो "मुस्लिम" नाही याची कृपया नोंद घ्यावी !


  *मुली - महिला असुरक्षित!* 


बदलापूर घटनेनंतर आता अन्य पालक निर्भयपणे  आपल्या मुलींना किंवा मुलांना *शाळेत* पाठवतील का .??? ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली तेथे मुलींना बाथरूम  साठीजायचं असेल तर तेथे "महिला सफाई" कर्मचारी होते का ?? शी धुण्यासाठी   सफाई महिला कर्मचारी असतात. पण येथे पुरुष कर्मचारी "संस्थेतील" कोणाच्या शिफारशीने कामाला रुजू झाला होता ?? यापूर्वी शाळेत अन्य मुलींबाबत असे प्रकार घडले आहेत का ??? याचीही "चौकशी" होणे गरजेचे आहे.


 *CCTV चे गौडगंबाल!* 


बदलापूर मधील शाळेत CCTV फुटेज का मिळाले नाही ??? का जाणीवपूर्वक CCTV मधून रेकॉर्डिंग डिलीट  करण्यात आले ??? संस्थाचालकांचा यामध्ये सहभाग होता का ??  पॉक्सो कायद्याच्या  कलम 21 अंतर्गत  या प्रकरणात पोलिसांनी संस्था,शाळा आणि "जबाबदार" कर्मचारी यांना देखील *आरोपी* करायला हवे. अन्यथा पालक त्यांच्या "वकीलांमार्फत" अथवा ते दाखल करू शकतात. 

खोक्यांचे सरकार स्वतः प्रामाणिकपणे सत्तेत आले आहे का ?? मुले -मुली जर महाराष्ट्रात सुरक्षित नसतील तर  "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" काय कामाची ?? जिथे  दिवसा ढवळ्या अत्याचार - बलात्कार होतात. महिला - मुली सुरक्षित नसतील तर सरकारने डोळसपणे आत्मचिंतन  करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

त्याशिवाय महाराष्ट्र सरकारने श्री. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून निवड केली आहे .भाजपा  कडून मुंबई मध्ये त्यांनी "निवडणूक" लढवली होती. व पराभूत झाले होते. शाळा ही सत्ताधारी पक्षाच्या हितचिंतकांची असेल तर शाळा आणि संस्था यांच्यावर गुन्हे नोंद होतील का ??? सरकारी वकील उज्वल निकम योग्य व खरा  न्याय  देऊ शकतील का ??? 


 कलकत्ता डॉक्टर रेप आरोपी संजय रॉय ,बदलापूर बलात्कार आरोपी अक्षय शिंदे !


"नोटबंदी" एका दिवसात होत असेल, सरकार एका दिवसात स्थापन होत असेल,सरकार एका तासात पडत असेल तर बलात्कार  करणाऱ्या आरोपीना रान मोकळे का ??? कायदा नसताना तुम्ही नोटबंदी करता, लॉकडाऊन  करता , हवे तसे कायदे करता पण 3 वर्षाच्या  मुलीवर बलात्कार होतो अत्याचार होतो पण "पोलीस स्टेशन" मध्ये त्या मुलीची आई गरोदर असताना देखील  13 - 13 तास तक्रार नोंदवली जातं नाही ..असे का ??? "पोलीस अधिकारी"  महिला असताना देखील बलात्काराचे "गांभीर्य"  नसेल तर त्या महिला अधिकाऱ्याला बडतर्फ  का करू नये ??? ज्या मुलीवर  आदर्श शाळेमध्ये अत्याचार झाला, ती शाळा हें कबूल करत नसेल आणि पालकांना सामोरे जातं नसेल तर हा निर्लज्जपणाचा  कळस नाही का ??? महाराष्ट्र शासनाने अशा संवेदना नसणाऱ्या शाळेच्या संस्थेचे नोंदणी तात्काळ "रद्द" करावी.आणि या शाळेचे मुख्याध्यापक ,कर्मचारी यांच्यावर देखील गुन्हा नोंद करावा .


 *पुढारीपण मिरवणारे चौथ्या स्तंभाचे कसाई !*


लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारिता होय.तथापि आज या पत्रकारितेमध्ये स्वार्थ, केबिनेट दर्जाची सुविधा असणारे पद आणि जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येणारा पैसा यामुळे खरी पत्रकारिता लोप  पावत आहे. 

भारतात मुस्लिमांना "खलनायक"दाखवत, भारताचे शत्रू दाखवत ,जातीयवादी पक्षाच्या विचारधारेला जागत, मुस्लिमांचे खच्चीकरण करण्याचा डाव आखला जातं आहे. 

कारण 15 दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यात खुनाची घटना घडली. त्यात 2 आरोपी होते.परंतु त्यात पहिल्या पानावर  फक्त  मुस्लिम तरुणाचा फोटो  व नावं होते. परंतु दुसऱ्या अन्यधर्मीय तरुणाचा फोटो नव्हता. असे का ???  एक नव्हे दोन नव्हे तर कित्येक वेळा अशाप्रकारे ठळक मोठ्या अक्षरात*? बातमी तयार करून व संबंधितांचा फोटो टाकून मुस्लिम समाजाची बदनामी करण्याचे सऱ्हास प्रकार "पुढारी"पण करणाऱ्या वृत्तपत्राकडून घडत आहेत. 



"जातीयवादी विचारधारा "आणि अमाप पैशाला तुम्ही विकले गेला असाल पण भारतातील 140 कोटी   जनता तुमचे कर्तृत्व आणि "सोयीची पत्रकारिता"  जाणून आहे. लोकशाहीची सकाळ आता उगवणार आहे,थोडे दिवस थांबा ...! भारतात "सत्तापरिवर्तन"  होणार आहेच. किंवा पुन्हा एकदा मध्यावर्ती निवडणूक होण्याची शक्यता आहे.  बदलापूर मध्ये आरोपीला "फाशी" व्हायलाच हवी. कारण समस्त चिमुकली मुलींची  आणि महिलांची ही "आर्त हाक" आहे ! 


*इकबाल  बाबासाहेब  मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा