उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळीनगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान माळीनगर यांच्या वतीने संग्रामनगर,माळीनगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू,फळे व खाऊचे वाटप माळीनगरच्या सरपंच अनुपमा एकतपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्राथमिक शाळेतील शिक्षक तांबोळी सर व थोरात सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
या जयंतीनिमित्त दिनांक 3 ऑगस्ट रोजी समाजभूषण पी.जी. माने,रा.बिदाल,तालुका माण यांना मंडळाच्या वतीने दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र विकास सेना अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत फेटा,स्मृतीचिन्ह व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जग प्रसिद्ध फकीरा या कादंबरीच्या ५० प्रतींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच विविध स्पर्धांमधील विजयी महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास माळीनगरचे माजी सरपंच अभिमान जगताप,मार्गदर्शक बाळासाहेब कांबळे,अध्यक्ष केशव लोखंडे,उपाध्यक्ष उमेश भाले,खजिनदार अजय अडगळे, निर्गुण लोखंडे, सत्यवान कांबळे, सागर नाईकनवरे, मल्हारी आस्टुळ,सनी आडगळे,कांतीलाल भाले,रामभाऊ आडगळे,मधुकर लोखंडे,संजय लोखंडे,आनंद लोखंडे,राहूल लोखंडे तसेच वेळापूरचे रुबाब भाई,धानोरेचे नागेश नाईकनवरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॉडेल हायस्कूलचे शिक्षक सुनील लांडगे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा