*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
माळशिरस तालुक्यातील लवंग २५/४ येथील फिनिक्स स्कूल मध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिवस विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी सैनिक गणपत जाधव,मनोहर भोळे,सीताराम भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन व ध्वजारोहन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य व इंग्लिश मराठी व हिंदी भाषेतून देशभक्तांच्या आठवणीत त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचे उदाहरणे देत भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी शाळेच्या संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख पालकसंघाचे अध्यक्ष निलेश वाघ उपाध्यक्ष महादेव कोळेकर महिला पालक संघाच्या अध्यक्ष शीतल भुजबळ,गुलशन शेख, तमन्ना शेख व पालक,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.निलेश वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा