Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

ओझरे येथे शहीद जवान वजीर रास्ते यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार दत्तात्रय भरणे यांनी वाहिली आदरांजली


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

- -- ओझरे (ता.इंदापूर) येथील कारगिल शहिद वजीर दत्तात्रय रास्ते यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुतळ्याला पुष्पहार  अर्पण करुन अभिवादन केले.

   ओझरे (ता.इंदापूर) येथील कारगिल शहीद जवान वजीर दत्तात्रय रास्ते यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, तहसीलदार जिवन बनसोडे, माजी कर्नल बी. जी. पाचर्णे, इतर माजी सैनिक तसेच शहीद जवान यांच्या पत्नीसह, सामाजिक कार्यकर्ते तसेच ओझरे परीसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



    आमदार दत्तात्रय भरणे यांनी कारगिल शहीद जवान वजीर रस्ते यांनी कुटुंबाची परवा न करता देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे बलिदान तालुक्याला व देशाला भुषणावह बाब आहे. त्यांचे वीर पिता दत्तात्रेय रास्ते व वीर माता बायडाबाई रास्ते यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. 

फोटो :-ओझरे (ता. इंदापूर) येथे कारगिल शहीद जवान वजीर रास्ते यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहताना आमदार दत्तात्रय भरणे सह मान्यवर उपस्थित होते.

---------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा