Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

*अकलूज येथील "आदित्य निंबाळकर" याचा राज्याच्या पथ संचलनात सक्रिय सहभाग*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

प्रत्येक वर्षी लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क मुंबई येथे मा. राज्यपाल रमेश बैस व मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाल्यानंतर परेडमध्ये राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्याचा संघ सहभागी होत असतो. त्यामध्ये अकलूज, रा. मसूदमळा येथील व शिक्षण प्रसारक मंडळ चे सदाशिवराव माने विद्यालय अकलूज चा माजी विद्यार्थी चि. आदित्य गणेश निंबाळकर याने प्रजासत्ताक दिनी झालेल्या महाराष्ट्र राज्य पथ संचलनात प्रमुख DD म्हणून भूमिका बजावत सक्रिय सहभाग नोंदवला. 

प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली होती. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ५६ हजार सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून एकूण ९० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती आणि ९० त्यापैकी एक आदित्य होता. राज्य पथसंचलनासाठी आदित्यने महाविद्यालय, जिल्हा व विद्यापीठस्तरीय निवड चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली होती. उत्कृष्ट कला गुणांचे आविष्कार दाखवत सोलापूर येथे झालेली अंतिम फेरी गाठली व राज्यस्तरीय पथ संचलनासाठी आदित्य याची निवड करण्यात आली होती.


आदित्यने पत्रकाराशी संवाद साधताना म्हणाला की सदाशिवराव माने विद्यालय अकलूज मध्ये शिकत असताना मी शैक्षणिक व इतर विविध सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभागी होत होतो त्यापैकी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त २६ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या दिल्लीच्या राजपथावर प्रमाणे अकलूजच्या महावीर पथावर संचलन पार पडले. त्यामध्ये मीही सहभागी झालो होतो. त्याचा मला या संधीसाठी फायदा झाला. त्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो त्यामुळे मी माझ्या संस्थेचे अध्यक्ष मा. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व संस्थेचे संचालक संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांचे मनापासून आभार मानतो.

आदित्यने नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या शाखेतून बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. 


आदित्यच्या या सहभागा बद्दल समस्त ग्रामस्थांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा