Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने ५१ सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा २३ ऑगस्टला वाघ पॅलेसच्या मैदानावर संपन्न होणार - प्रविण भैय्या माने

 



--- सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वाघ पॅलेसच्या मैदानावर संपन्न होणार आहे. यामध्ये जवळपास ५१ सर्वधर्मीय विवाह होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती, प्रतिष्ठानचे संचालक प्रविण भैय्या माने यांनी दिली.

     इंदापूर येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रविण भैय्या माने बोलत होते. यावेळी वसंत सोलनकर, शिवाजी जगतात, साधू नरुटे आदि मान्यवर उपस्थित होते. विवाह सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ दादा माने आदी मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

    सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने यापुर्वी सन २०१८ मध्ये ७५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा दिमाखात संपन्न करण्यात आला. याच परंपरेनुसार यावर्षीही ५१ जोडप्यांचा विवाह पार पाडला जाणार आहे. पत्रकार परिषदेनंतर ५१ जोडप्यांना मनी मंगळसुत्र, पोशाख व साहित्य वाटप करण्यात आले.


    सामुदायिक विवाह सोहळ्याला खासदार शरद पवार जरी उपस्थित राहणार नसले तरी खास सप्टेंबर महिन्यात शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे प्रविण भैय्या माने यांनी सांगितले. महाराष्ट्रातील बळी राजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मागील ६५ वर्षांपासून लढा देणारे शरद पवार यांच्या विचारांचे सरकार राज्यात येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.



    अजीत पवार गटातून शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलेल्या प्रविण भैय्या माने यांना आपल्या कार्यकर्त्यांना आपण आमदार व्हावे असे वाटते तुम्हाला काय वाटते असे विचारले असता मलाही आमदार व्हावे असे वाटते. त्यामुळे प्रविण भैय्या माने सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आमदारकीचे रणसिंग फुंकणार का?

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा