*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात किमान 80 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झालेला असल्याने आणि चार ऑगस्ट 2024 रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्याने उजनी धरणात येणारी पाण्याची आवक सद्यस्थितीत 72 हजार क्युसेस असल्याने त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे
त्या अनुषंगाने सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र कृष्णा भीमा कोरे विकास महामंडळ पुणे 11 महाराष्ट्र शासन अंगीकृत कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांनी पत्राद्वारे
भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे की १. उपविभागीय अधिकारी, उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग, भीमानगर यांचे पत्र जा.क्र. उधव्यउवि /प्रशा / २१३/दि.०३.०८.२०२४.
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यांत येते की, उजनी धरणात आज रोजी रात्री ९ वाजता ७९% पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे.. तसेच आज दिनांक-०३.०८.२०२४ रोजी पाणलोट क्षेत्रामधील पुणे जिल्हासाठी ऑरेंज अलर्ट व उदया दिनांक ०४.०८.२०२४ रोजी रेड अलर्ट हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. दौंड येथील सरीता मापन केंद्र या ठिकाणावरून पाण्याची आवक सदयस्थितीत ७२००० क्यूसेक्स एवढी आहे व त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
उजनी धरणाचे पूर नियंत्रण करणेकामी आवश्यकतेनुसार सुरूवातीला कालवा, सीना माढा जोड कालवा (बोगदा), सोना माढा उपसा सिंचन योजना व दहीगांव उपसा सिंचन योजना मधून पुरनियंत्रणासठी विसर्ग सोडण्यात येणार आहेत. तदनंतर पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व उध्वं भागांमधील धरणांमधून सोडलेला विसर्ग व येणारी पाण्याची आवक लक्षात घेता पुरनियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार उजनी धरण सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये केव्हाही विसर्ग सोडण्याची शक्यता आहे.
तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देणेसाठी पञ दिले आहे
माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.
कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर.
प्रत - मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर/पुणे यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सविनय सादर.
प्रत मा. पोलीस अधिक्षक (ग्रामीण), सोलापूर/पुणे यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सविनय सादर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा