इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- उजनी धरण भरत आल्याने धरणातून भिमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नदी काठावरील विद्युत मोटारी, पाईप, स्टार्टर्स सुरक्षित स्थळी हलविण्याची लगबग सुरू केली आहे. सध्याला भिमेत एक लाख क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने पुणे व परीसरात जोरदार हजेरी लावल्याने वरील सर्व धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्यामुळे ज्यादाचे पाणी खाली सोडले जात असल्याने उजनी धरणात एक लाख साठ हजार क्युसेक्सचा विसर्ग येवून मिसळत आहे. त्यामुळे काल रविवार पासून २० हजाराने सोडले जाणारे पाणी रात्री ६० हजाराने सोडले जात होते. परंतू वरून येणारे पाणी कायम राहिल्याने भिमा नदीत आज सकाळी ११ वाजता एक लाख क्युसेक्सने सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
त्यामुळे भिमा नदी काठावरील इंदापूर व माढा तालुक्यातील हिंगणगाव ते नरसिंहपूर पर्यंतच्या शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत मोटारी, पाईप, स्टार्टर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे. परीसरात मागील दिड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना नदीच्या पाण्याने जगवले जात होते. परंतू वरील पावसाचे पाणी नदीला आलेमुळे विद्युत मोटारी, पाईप, स्टार्टर काढावे लागल्याने आता पिके वाचवायची कशी असा सवाल केशव बोडके(पिंपरी बुद्रुक), गोविंद सुळ(गोंदी), राहुल बागल(गणेशवाडी), रणधीर मोहिते(टणू), नरहरी काळे(नरसिंहपूर) यांनी केला आहे.
नीरा व भिमा नद्यांना सोडलेल्या पाण्यामुळे नरसिंहपूर परीसरात पुर परस्थिती निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून पोलीस, तलाटी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांनी गावोगावी जाऊन पुरपरस्थितीत घ्यावयाची काळजी बाबत सुचना दिल्या आहेत. तसेच काही कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
फोटो - गणेशवाडी येथील भिमा नदी काठावरील विद्युत मोटारी, पाईप सुरक्षित स्थळी हलवताना शेतकरी दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा