Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

इंदापूर तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साथ द्या - हर्षवर्धन पाटील

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- इंदापूर तालुक्यात सहकार, शिक्षण, शेतीच्या क्षेत्रात आमच्या विचारांच्या आधारे ५५ वर्षात आमुलाग्र बदल घडवला आहे. तशाच पद्धतीचा विकास घडवण्यासाठी आगामी निवडणुकात साथ द्या असे आवाहन राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.

    टणु (ता इंदापूर) येथील चव्हाणवस्ती ते टणू रिंगरोडच्या चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संजय बोडके, प्रकाश मोहिते, समीर मोहिते, तेजस मोहिते, राजेंद्र मोहिते, नाथाजी मोहिते, आजीत मोहिते, विठ्ठल घोगरे, नेताजी मोहिते, सयाजी मोहिते, चंद्रकांत जगदाळे, सतीश बळते, विठ्ठल बळते, सत्यवान मोहिते, सुरेश चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



   हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले टणु गाव मागील पन्नास वर्षापासून आपल्या विचारांच्या पाठीमागे राहून आपल्याला साथ दिली आहे. इंदापूर तालुक्याचा विकास मागील दहा वर्षांपासून थांबलेला आहे. यापुढे विकास चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी पाठीमागील प्रमाणे यापुढेही साथ द्यावी. सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजूर यांना कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत. ठेकेदारांनी रस्त्याचे काम दर्जेदार व चांगल्या प्रकारचे करावे, कामात हलगर्जी पणा करता कामा नये. ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे.  

  प्रास्ताविकात संचालक प्रकाश मोहिते यांनी गावाच्या रिंगरोडसाठी ज्यादाचा निधी द्यावा, मातंग समाजाला २५ लाखाचे समाज मंदिर मंजूर करावे अशा मागण्या मांडल्या.

   कार्यक्रमात राजेंद्र मोहिते, संदिप मोहिते, सत्यवान मोहिते आदिंची भाषणे झाली. आभार समीर मोहिते यांनी मानले.

फोटो -टणु येथील चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे फलक अनावरण प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व ग्रामस्थ. 

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा