Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

*महाळुंग नगरपंचायत कडून प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांना गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्या बद्दल आर पी आय युवा नेते सुधीर भोसले यांचा इशारा*

 


*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.

महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे वतीने करण्यात येणारा पाणी पुरवठा योजनेचे पाणी गढुळ व दुषित येत आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे नागरिक लहान मुले आजारी पडले आहेत जर येत्या सात तारखेपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित न केल्यास त्याच गढुळ व दुषित पाण्याने संबंधित अधिकारी व पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांना नगरपंचायतचे कार्यालयात जलाभिषेक घातला जाईल असा इशारा आरपीआय चे युवक नेते सुधीर भोसले यांनी दिला आहे या संदर्भात नगरपंचायतचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पाऊस चालू आहे आम्ही पाणी फिल्टर करुन सर्वांना पुरवठा करत आहे पाणी पुरवठा करत असताना भीमा नदीपात्रातील पाणी गढुळ आहे फिल्टर जल शुद्धीकरणातून फिल्टर केले जात आहे तरीही पाऊस पडत असल्याने वरून पाणी गढुळ स्वरुपात नदीपात्रात येत आहे पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टरला दिवस पाळीला सात किलो टीसीएल व तुरटी दहा किलो तसेच रात्र पाळीला सात किलो टिसीएल व दहा किलो तुरटीचा वापर केला जात आहे/मिरे येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ही प्रक्रिया सुरू आहे हेच पाणी महाळुंग श्रीपूर भागात पाणी पुरवठा केला जातो त्या बाबत अन्य कोणत्या वार्डातील नागरिकांची तक्रार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा