Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ता व पदाधिकारी अभ्यास वर्ग उत्साहात पार


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

:- --अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुक्याचा कार्यकर्ता व पदाधिकारी अभ्यास वर्ग न्हावी (ता. इंदापूर) येथील विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभागृहात दि. १० ऑगस्ट रोजी संपन्न झाला.

    ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे, महिला जिल्हाध्यक्षा नायनाताई आभाळे, संघटक दिलीप बेंद्रे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.                                 यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष तुषार झेंडे यांनी अनमोल मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने सामान्य जनतेच्या दररोजच्या जीवनात येणाऱ्या समस्या, विविध फसव्या जाहिराती,  ग्राहक मंचाची रचना, कार्य, व्याप्ती व महत्त्व वास्तविक उदाहरणे देऊन अतिशय साध्या व सोप्या शब्दात उपस्थितांना समजावून सांगितले.

     याशिवाय केंद्रीय ग्राहक पंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध विषयांची माहिती उपस्थिताना दिली. दिनांक २३ व २४ ऑगस्ट रोजी मंचर येथे होणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा अभ्यास वर्गास तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.   

   इंदापूरचे तत्कालीन कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांची नुकतीच सोलापूरला बदली झाली असल्यामुळे ग्राहक पंचायतीच्या वतीने त्यांच्या कार्याची कृतज्ञता म्हणून त्यांना कै. एस.डी पाटील सर "कृतज्ञता पुरस्कार २०२४-२५"  देऊन गौरविण्यात आले.              यावेळी बोलताना तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची सरस -निरस माहिती दिली तसेच मामलेदार ऍक्ट उपस्थितांना समजावून सांगितला. इंदापूर तहसील कार्यालयाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या कार्यकाळात ७/१२ ला असणाऱ्या पोट खराबचा शेतकऱ्यांसाठी निरोपयोगी असणारा शेरा तहसील पातळीवर हटवण्याच्या ऐतिहासिक योजनेची सुरुवात केली.

    याशिवाय यावेळी "कै.एस. डी. पाटील कृतज्ञता पुरस्काराने"  सौ. साबिया  महंमद शेख, (शिक्षण), बाळासाहेब तांबिले (महसूल ), रामदास बनसोडे (समाजकार्य), राजकुमार रासकर (उद्योग), दादासाहेब भोंगळे (दूरसंचार), धनाजी म्हारनूर (वैद्यकीय) यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या आदर्श कामाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.                    यावेळी वालचंदनगरचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, लोणी देवकरचे मंडल अधिकारी पवार साहेब, महावितरण, कृषी, वन विभागाच्या प्रतिनिधी सह दौंडचे पदाधिकारी रमेश लडकत, ग्राहक पंचायतीचे जिल्हा कृषी विभाग प्रमुख किशोर भोईटे, तळेगावच्या महिला शहरअध्यक्षा वृषाली बनकर, बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, संघटक सतीश खंडाळे, इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, संघटक सचिन रणसिंग, सहसंघटक चांगदेव शिंदे, सचिव अभिमन्यू घाडगे, सहसचिव आबासाहेब निंबाळकर, कोषाध्यक्ष मनोज पवार, सदस्य अक्षयाताई इंदापूरकर, रसूल पठाण, श्रीकांत घोगरे, लिंबाजी कुंभार, न्हावीच्या सरपंच सौ.आशा दिपक डोंबाळे, माजी सरपंच बळवंत बोराटे, माजी उपसरपंच प्रकाश रासकर पाटील, महादेव यादव, विजय भोसले, सोमनाथ रणसिंग, यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.      

     पुणे जिल्हा सहसंघटक दिलावर तांबोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी समारोप करून उपस्थितांचे आभार मानले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा