उपसंपादक --नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
भारतीय संस्कृतीत सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातत . विदयार्थ्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास न करता, सर्व धर्मियांच्या सण उत्सवांची माहिती व्हावी , आपल्या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी लहान व्यापासूनच व्हावी या उद्देशाने फिनिक्स इंग्लिश स्कूल मध्ये नेहमीच वेगवेळे उपक्रम राबवून विद्यार्थ्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून सदैव प्रयत्न केले जातात.
गोपाळकाला चे औचित्य साधून शाळेतील नटखट बाळ गोपाळ राधिकेच्या व कृष्णाच्या सुंदर वेशभूषेत अतिशय मनमोहक दिसत होते . मुलींना खरोखरचं मी आज कृष्णाची सखी राधाच आहे तर मुलांना बासरी वाजविणारा मी आज कान्हा , साक्षात देवाचे रूप घेतल्याचा निरागस आनंद बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.गोविंदा बनलेला प्रियांश गायकवाड याने दहीहंडी फोडली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेच्या संथापक आध्यक्ष नूरजहाँ शेख. पालक संघ महिला अध्यक्षा शीतल भुजबळ शिक्षिका गुलशन शेख ,तमन्ना शेख यांनी परिश्रम घेतले .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा