Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

*"वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाची "भाजपच्या मित्र पक्षाची ही फेरविचाराची मागणी--सुप्रिया सुळे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

पुणे -* 'केंद्र सरकारकडून वक्‍फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडून ते मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही कडाडून विरोध केला आहे. भाजपचेच मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांनी विधेयकाबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका घेतली आहे.' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले.


प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी भेट घेतली. त्यानंतर कडू यांच्यासमवेत सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करणार का? या प्रश्‍नावर बोलताना सुळे म्हणाल्या, 'मुख्यमंत्री पदावर आम्ही दावा केलेला नाही.


आमचा पक्ष यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारावर चालणारा पक्ष आहे. आम्ही सत्ता, पदे यापेक्षा विकास व चांगली धोरणे करण्यावर भर दिला जातो. आता महाराष्ट्रापुढे वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार व बेरोजगारी हे प्रश्‍न असून त्याविरुद्ध आम्ही लढा देणार आहोत. अगोदर सत्तेत येऊन चांगले काम करू.'


मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीच्या मतांवर परिणामांबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सुळे यांनी उत्तर दिले. सुळे म्हणाल्या, 'महाविकास आघाडीची मते जातील, त्याचप्रमाणे महायुतीचीही मते कमी होणार आहेत. परंतु आम्ही मतांची आकडेमोड करण्यासाठी आलो नाही. महायुतीच्या पहिल्या कॅबिनेटमध्येच धनगर समाजाला आरक्षण देऊ असे त्यांनी सांगितले होते. आता त्यास दहा वर्षे पूर्ण झाली, परंतु अजूनही आरक्षण मिळालेले नाही. हे सरकार लोकांना फसवण्याचे काम करत आहे.'


सुळे म्हणाल्या, 'बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी चांगले काम केले आहे, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणले असून हे पुढच्या कित्येक पिढ्या कधीही विसरणार नाहीत. जे चांगले लोक आहेत, त्यांनी एकत्र आले पाहिजे. सध्या देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. वित्तीय तूट वाढत असून त्याचा राज्यांवरही परिणाम होणार आहे. आंध्र प्रदेशात याचे परिणाम दिसत असून, महाराष्ट्राचेही असे हाल होऊ नयेत, यासाठीच चांगल्या लोकांनी राज्याच्या, देशाच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.'

सुळे म्हणाल्या,      


  घरे फोडा, पक्ष फोडा हेच या सरकारचे काम.


-इन्कमटॅक्‍स, सीबीआयच्या नोटीसांवरच हे सरकार तरले.

 महाविकास आघाडी 288 जागा चर्चेच्या मार्गाने सोडविणार.


-कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखूनच तिकिटां.चे वाटप होणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा