*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
देशाला महासत्ता बनवायचं असेल तर सर्व समाजाचा 'विकास' खूप महत्वाचा असतो, प्रत्येक वर्गाच्या घटकाला सोबत घेऊन प्रगतिशील समृद्ध देश उभा करावा लागेल, घडवावा लागेल, म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मा. न्यायमुर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन, मा. न्यायमुर्ती राजेंद्र सच्चर कमिशन आणि कुलगुरू डॉ. महेमदुर्रहमान कमिशन गठीत केले होते, त्यात या समितीने मुस्लिम समाजाच्या सामाजीक, आर्थीक, शैक्षणिक, सुरक्षेचा 'आरसा' समोर ठेवला होता, त्याचा आधार घेत मुस्लिम समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं झाली, मोठ मोठी मोर्चे निघाली शिक्षण, आरक्षण, संरक्षण सारख्या जिल्हानिहाय 'मुस्लिम कॉन्फरन्स' झाल्या, परंतु जाणीवपूर्वक सत्तापक्ष आणि विपक्ष मुस्लिम समाजाच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करू लागले, दोन वेळच्या 'घासा'चा प्रश्न म्हणून 'आरक्षणा'ची मागणी आहे, शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे या महागड्या शिक्षणाची मोफत सोय व्हावी हि मागणी आहे, बांगलादेशी, पाकिस्तानी, रोहिंग्या, यावरून तर कधी गोवंशच्या नावाने मुस्लिमांची 'मॉब लिंचिंग 'होतेय, आता तर पुसेसावळी, गजापूर सारख्या घटनेमुळे भयावह दहशतीच्या सावटाखाली जगावं लागत आहे यासाठी सन्मानाची आणि सुरक्षेचे 'कवच' म्हणून 'संरक्षणा'ची मागणी आहे. राजकीय पटलावर तर हा समाज आता 'पोरका' झालेला
आहे, सामाजीक चळवळीतील नव्हे तर 'पुरोगामी' म्हणवणाऱ्या पक्षांनाही त्यांच्या
पक्षात काम करणारा 'मुसलमान' आता 'अस्पृश्य' झालेला आहे हे या लोकसभेच्या
आणि विधान परिषदेच्या निवडणुकांदरम्यान सिद्ध झाले आहे, मुस्लिमांच्या सामाजिक
प्रश्नांवर 'मंथन' व्हावं राजकीय समस्यांवर 'समाधान' व्हावं यासाठीच ही 'मुस्लिम
आरक्षण, शिक्षण, संरक्षण परिषद' चे आयोजन शनिवार दि.१७ आॕगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत --पटेल फंक्शान हाॕल पटेलनगर ,कन्हेरी चौक लातूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात
आले आहे, या राज्यस्तरिय एकदिवसीय 'मुस्लिम परिषदेस आपले गट-तट, पक्ष, संघटना बाजूला सारून उपस्थित राहावे असे आवाहन लातूर जिल्हा ,मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती यांच्या वतीने
करण्यात आले आहे..
आयोजक : मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, जिल्हा लातूर
9822008896, 9373316013




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा