Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

*सावधान... घरबसल्या लिखाण करून 5000/- रुपये देणारे फसवणुकीचे नवे स्कॅडल बाजारात*

 


*इक्बाल बाबासाहेबा मुल्ला*

  *सांगली*

   *मो. 8983 587 160

*हाताने लिखाण करून 1000 रुपये देण्याचे अमिष !* 

*लॅपटॉप* नव्हे तर आता त्यापुढील "टेक्नालॉजिस " चा अविष्कार जगभरात झाला असताना, *कॅपिटल अक्षरात* " इंग्रजी टायपिंग करा आणि दररोज 1000 रुपये मिळवा असे "अमिष" दाखवत नवरोजगार आणि तरुण -तरुणींना *लूटण्याचा* "गोरखधंदा" सुरु आहे.

तरुण आणि तरुणींना फसविण्याच्या या नव्या स्कँडलमुळे प्रत्येकी *25000 ते 50000* रुपयांचा "फटका" बसत आहे .

वास्तविक जग "चंद्रावर" गेले असताना काही लोक अजूनही *मराठी /इंग्रजी* टायपिंग करून पैसे मिळतील या "आशेवर" जगत आहेत हें दुर्दैव आहे.  

वस्तुतः *इंग्रजी कॅपिटल* टायपिंग चे "पर्याय" *कॉम्प्युटर - मोबाईल* अथवा लेपटॉप मध्ये उपलब्ध असताना मनुष्याकडून हाताने कोण आणि कशाला *टायपिंग* करून घेईल का ??


 *100 फुटी रोडवरील फसवणुकीचा दुसरा अध्याय !* 

ज्याप्रमाणे 100 फुटी कॉर्नर ला *47000 रुपये* किंवा 50000 रुपये भरून तरुण - तरुणींना *नोकरी* देतो म्हणून फसवणूक होत होती,त्याचा *भांडाफ़ोड* सर्वप्रथम मी माझ्या निडर, निष्पक्ष *पत्रकारितेच्या* माध्यमातून केला होता. त्यानंतर सर्व *सामाजिक कार्यकर्त्यांनी* धाव घेत ही फसवणूक बंद केली.

ते प्रकरण थांबते न थांबते तोच नव्या प्रकारे तरुण- तरुणींना गंडा घालण्याचे नवीन *स्कँडल* आता जोर धरू लागले आहे. 

वास्तविक *दहा - पंधरा वर्षांपूर्वी* अशाप्रकारचे स्कँडल "महाराष्ट्रात" फोफावले होते. तरुण -तरुणींना फसवून "उजळ" माथ्याने फिरणारे *भामटे* अजूनही पाहवयास मिळतात.परंतु त्यांना ना खंत ..*ना पश्चाताप* ! तरुण -तरुणींना नवनवीन क्लुप्त्या करून ,नवनवीन योजना आणून त्यांच्या जाळ्यात अडकवतात. आणि स्वतः नामानिराळे राहतात.



 *तरुण - तरुणींना फसविण्याची नवी पद्धत* कोणत्याही *वर्तमानपत्रात* घरबसल्या लिखाण करा,आणि दररोज *1000 रुपये* मिळवा ही जाहिरात आपण पहिली असेल. जर एखाद्या तरुणाने त्या जाहिरात असणाऱ्या *मोबाईल* क्रमांकावर फोन केल्यास ते तुम्हाला *ऑफिस* असेल तर ऑफिसात किंवा मोबाईल *ऍप्सचे* नावं सांगतात. आणि तो ऍप्स "डाउनलोड" करण्यास सांगितले जाते.सर्वप्रथम 30 पानांच्या " बंचची " *प्रिंट* काढून घ्या, आणि त्यावर तुमची *सही* करा असे सांगितले जाते. गरजवंत त्या 30 पेजवर सही करतो. ते बंच एका नंबर वर किंवा पत्ता दिलेल्या *ऍड्रेस* वर पाठविण्यास सांगितले जाते,किंवा त्या ऑफिस मध्ये जमा करण्यास सांगितले जाते . त्यानंतर *1000 -2000* भरून घेतले जातात. त्यानंतर खरा *खेळ* सुरु होतो. संबंधित तरुणाला *50 ते 60 पाने* टाईप करण्यास सांगितले जाते. तो गरजवंत तरुण पाने चांगल्या *हस्ताक्षरात* लिहितो आणि त्यांना दाखवतो .तेंव्हा यामध्ये प्रचंड *चुका* आहेत असे सांगत पुन्हा एकदा लिहायला सांगितले जाते. तो तरुण पुन्हा लिहून व्ययस्थित लिहून पून्हा देतो.त्यानंतर पुन्हा एकदा यात चुका राहिल्या आहेत. नवीन लिहून आणा असे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा - पुन्हा असे प्रकार होतात. यामध्ये *चिडून* तो तरुण मला कामं नको असे हताशपणे सांगत तिथून निघून येतो.

आता फसविण्याचा *फंडा* सुरु होतो. काही दिवसानंतर एक फोन येतो. ती व्यक्ती सांगते ,तुम्ही आमच्या कंपनीची *फसवणूक* केली आहे. तुम्हांला दंड अर्थात "पेनल्टी" भरायला लागणार असा दम दिला जातो. त्यानंतर *1 लाख* रुपये *दंड* होईल आणि दिल्ली च्या *कोर्टात* तुम्हांला यावे लागेल असे सांगितले जाते. हें सर्व ऐकून तो तरुण *हबकून* जातो ,घाबरतो. काही दिवसानंतर पुन्हा एक कॉल येतो आणि तुम्हाला दिल्ली येथे यावे लागेल तुमच्या विरोधात *पोलिसात* गुन्हा दाखल झाला आहे असे खोटे सांगत पुन्हा एकदा तरुणाला दम दिला जातो. वारंवार त्रासाला कंटाळून तो तरुण सेटिंग अर्थात *तडजोड* करू लागतो . तेंव्हा दिल्लीतील तो भामटा *तोतया वकील* सांगतो की तुम्ही ज्या 50 सह्या केला होता,त्यामुळे तुम्ही फसला आहात. काहीतरी द्या विषय मिटवतो असे सांगितले जाते. *अब्रू* जाईल आणि वयाच्या 18-20 वर्षीच *अटक /जामीन* ही भानगड नको म्हणून किमान 25-30 हजार देऊन यावर *पडदा* टाकला जातो. *परखड - निस्पृह आणि प्रामाणिक पत्रकारिता!*  

वास्तविक ज्या 30 पानावर त्या तरुणाने *सही* केलेली असते त्या पानावर अत्यंत *छोट्या अक्षरात* नियम व अटी असतात. कामाच्या नादात कोणी इतक्या "लक्षपूर्वक" पाहत नाही.याचाच *गैरफायदा* हें भामटे उचलतात.

एक *प्रामाणिक पत्रकार* या नात्याने , माझ्या *समाजप्रबोधनाने* आतापर्यंत मी कित्येक विषयात आणि प्रकरणात *प्रकाशझोत* टाकून त्या विषयाचा *भांडाफोड* केला आणि समस्त जनतेला "न्याय" दिला आहे .आत्तादेखील शेकडो तरुणांना या "घरबसल्या लिखाण" करण्याच्या फसवणुकीपासून मी *सावध* केले आहे. कोणीही *सहज* आणि "सोप्या" मिळणाऱ्या पैशाच्या लाभापासून सावध राहावे. कोणीही तुम्हाला पैसे देण्यासाठी *आतुर* झालेले नाही हे लक्षात ठेवावे.

समस्त तरुण - तरुणी या फसवणुकीच्या "मायाजाल" पासून *सतर्क* राहतील ही अपेक्षा !                  


    *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा