Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

*महाळुंग येथील ग्रामदैवत यमाई देवीचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्याने केले लंपास*

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

 *बाळासाहेब गायकवाड

महाळुंग येथील ग्रामदैवत यमाई देवीचे मंदिरातून सुमारे सव्वा तीन तोळयाचे सोन्याचे दागिने भरदिवसा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाळुंग च्या इतिहासात असे या पुर्वी अशी घटना कधी घडली नसल्याचे जुने जाणते नागरिक यांनी म्हटले आहे विशेष म्हणजे हे दागिने चोरट्यांनी भर दिवसा लंपास केले आहेत यमाई देवीचे मंदिरात दरवर्षी प्रमाणे शारदीय नवरात्रौत्सव असतो या नवरात्रोत्सव तयारी व मंदिर परिसरात आत साफसफाई व इतर किरकोळ कामे करण्याचे काम सुरू होते या मंदिरात दरवर्षी एक वर्ष पुजेचा मान व मंदिर देखभाल या साठी प्रत्येकी एक वर्ष गुरव समाजाला मान दिला जातो देवीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे या दरम्यान महाळुंग चे सर्व नेते कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी मंदिरात सार्वजनिक बैठक घेतली या मंदिरात देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने गेल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला गावाची बदनामी होऊ नये व देवीला सोन्याचे दागिने घालण्यासाठी त्या बैठकीत सर्वांनी स्व इच्छेने लोकवर्गणी जमा केली व जेवढं सोन्याचं दागिने चोरीला गेले आहेत तेवढ्या वजनाचे दागिने तयार करून देवीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे काही दिवसांपासून यमाई देवी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही बंद पडल्याचे समजते देवीच्या मंदिरात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा