Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

*ऑडिटर हा संस्थेचा आत्मा असतो--- जयसिंह मोहिते पाटील*

 


*अकलुज ------प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

    *टाइम्स 45 न्युज मराठी

 

कोणतीही सहकारी संस्था व्यवस्थित चालायची असेल तर संस्थेचे संचालक,सभासद व कामगार हे दक्ष असणे आवश्यक आहे.दरवर्षी संस्थेचे ऑडीट होते ते बरोबर आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे.संस्थेचा ऑडीटर हाच संस्थेचा आत्मा असतो असे मत सुमित्रा सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले . 

सुमित्रा सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन महादेव अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली .

               प्रारंभी संस्थेचे सरव्यवस्थापक प्रताप चव्हाण यांनी अहवाल वाचन केले.यावेळी व्हा.चेअरमन अशोक जावळे, संचालक विजय शिंदे,विजय दोशी,सुभाष दळवी,अभिजीत रणवरे,दिपक खराडे पाटील , विशाल फुले,श्रावण शिंदे यांच्यासह सभासद व कामगार उपस्थित होते.

        पुढे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,सभासदांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचा बारकाईने अभ्यास करुन संचालकांना प्रश्न विचारले पाहिजेत.संस्था व्यवस्थित चालविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.सरकारच्या कर्जमाफी धोरणामुळे राज्यातील सहकारी संस्था अडचणीत आल्या होत्या.सुमित्रा पतसंस्थेने गेल्या दोन महिन्यात ३० कोटी वसूल केला आहे.संस्थेचे ४५०० कर्जदार होते आता १४५० कर्जदार राहिले आहेत.संस्थेचा ३००० कोटी रुपये भांडवली खर्च आहे तर  १३०० कोटी कर्ज वाटप केले आहे. १७८ कोटी रुपये येणे आहे तर ७२ कोटी देणे आहे.सुमित्राचे कर्ज घेवुन शेतक-यांनी घर,जमिनी खरेदी केल्या आहेत.आज त्या जमिनीची,घराची किंमत करोडो रुपये झाली आहे.त्यांनी कर्जफेड करावी.संस्थेने ९९ टक्के कर्जदारांवर कारवाई केली आहे. पुढील दोन महिन्यात ३६ कोटी रुपये वसूल होतील तर वर्षभरात ७० कोटी वसूल होइल.पुढील आर्थिक वर्षात ९० टक्के वसूली करुन संस्था पुर्वपदावर आणु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

      सुमित्रा पतसंस्थेच्या संस्थेच्या माध्यमातुन आरोग्य,कला,क्रीडा शिक्षणासाठी  मदत केली.संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा