*अकलुज----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील जुना बाजार तळ येथील नागराज गणेशोत्सव मंडळ संस्थापक अध्यक्ष श्रीकांत शिवाजी दोरकर यांनी हे मंडळ २००५ साली जुना बाजारतळ येथे आपले मित्र व जेष्ठ लोकांच्या साहाय्याने हे मंडळ स्थापन केले होते.त्यामध्ये त्यांना मार्गदर्शक म्हणून महेश सूर्यवंशी यांचा खूप मोठा वाटा मिळाला.
सन २००५ सालापासून नागराज गणेशोत्सव मंडळाने आपल्या नियोजनाने विविध असे सामाजिक जनजागृतीचे व लोक कल्याणचे उपक्रम राबवले आहेत त्यामुळे अकलूजमध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये नागराज गणेशोत्सव मंडळाचे नाव लौकीक मिळविला आहे.नागराज गणेशोत्सव मंडळाने आतापर्यंत खूप असे देखावे साजरे केले आहेत व त्या माध्यमातून या मंडळाने प्रथम पुरस्कार मिळवले आहेत.नागराज गणेशोत्सव मंडळाने सादर केलेला आता पर्यंतच्या विशेष देखावामध्ये तुकाराम महाराजांची पालखी सोहळा,अकलाई देवीचा भंडारा, संत गाडगे महाराज एकच ध्यास, स्वच्छतेकडून समृद्धीकडे,स्त्री भ्रूणहत्या,मुलगी वाचवा मुलगी शिकवा देश वाचवा तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा स्वप्नातील कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा लाभ शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे व कसा मिळणार याचा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी व जनसामान्य लोकांसाठी संदेश देण्यात आला तसेच गणेश मूर्तीच्या बाबतीत पण नागराज गणेशोत्सव मंडळांनी आपल्या नियोजनाच्या कलेच्या सहाय्याने काचेचा गणपती,नारळातील गणपती,दहीहंडी फोडत असलेला गणपती,महादेव रुपी गणपती, टकला गणपती,कृष्ण गणपती असे विविध प्रकारच्या रूपात गणपती सादर केले.
नागराज गणेशोत्सव मंडळांनी स्त्रियांना प्राधान्य म्हणून स्त्रियांसाठी विविध असे कार्यक्रम आपल्या मंडळाच्या मार्फत आयोजित करून स्त्रियांना प्राधान्य दिले त्यामध्ये होम मिनिस्ट्री,संगीत खुर्च्या,रांगोळी स्पर्धा,गौरी गणपती सजावट स्पर्धा तसेच स्त्रियांसाठी अष्टविनायक दर्शन अशा खूप सार्या विविध नियोजनातून त्यांनी आपल्या मंडळाला एक वेगळी दिशा व ओळख निर्माण केली. २०१९ च्या कोविडच्या महामारीमध्ये नागराज गणेशोत्सव मंडळ परिवारांनी गोरगरीब जनतेसाठी त्यांना अन्नधान्य वाटप केले.अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागराज गणेशोत्सव मंडळाने आतापर्यंत जनजागृती समाज कल्याण प्रबोधित करून खूप सारे देखावे साजरे केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा