Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

*जगाला" प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर" यांच्या आदर्श विचारांची गरज*


 

*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

  *(पञकार)--सांगली*

   *मो;-9883 587 160*

*ईद ए मिलाद !* 

अल्लाहने  जगाची निर्मिती ज्यांच्यासाठी केली त्या महान प्रेषित मोहम्मद  पैगंबर (स.अ) यांचा  "जन्मदिवस" म्हणजेच  "ईद ए मिलाद "  ! 

मोहम्मद पैगम्बर यांच्या आई म्हणजे  आमीना ! आमीना या गरोदर  असताना त्या जेथे जातील तेथे सुगंध  दरवळत  होता. सर्वांचा "गैरसमज"  होता की  बहुदा अलीमा दर्जेदार अत्तर  वापरतात.  पण तो सुगंध मोहम्मद पैगंबर यांचा होता. जेंव्हा मोहम्मद आईच्या गर्भात   होते तेंव्हा त्यांच्या आई आमीना ज्या रस्त्यावरून जातं ,त्या रस्त्याच्या आजूबाजूची झाडे दोन्ही बाजूला झुकून त्यांना  सावली देत,अमीना जेंव्हा वाळवंटात जाई तेंव्हा "ढग" त्यांच्या वर येऊन सूर्यापासून त्यांचे "संरक्षण" करत त्यांना सावली   देई. 

जमजम  नावाच्या सुप्रसिद्ध विहिरीजवळ  पाणी खोल असायचे.परंतु अमीना जेंव्हा गर्भात असणाऱ्या मोहम्मद यांच्यासह जाऊन पाणी आणायला गेल्यावर  त्या विहिरीतील "पाणी"  आपोआप वर  येई. आणि अमीना सहजपणे ते पानी घागरीत   भरत असत. जोपर्यंत अमीना विहिरीजवळ असायच्या तोपर्यंत पानी वर येई. आणि त्या गेल्यानंतर पानी पुन्हा "खाली" जाई. त्यामुळे आजूबाजूच्या महिला अमीना यांना विहिरीजवळ थांबायचा आग्रह करत .व पानी भरून घेत असत. 

सर्वसाधारणपणे महिलांना प्रसूतीवेळी कळा येतात ,प्रचंड त्रास होतो.परंतु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मावेळी असे काही घडले नाही. परंतु ,जे घडले ते विलक्षण होते.

सर्वसाधारणपणे "आईच्या"   नाळेला मुलाची नाळ जोडलेली असते. परंतु मोहम्मद यांच्या प्रसूतीवेळी त्यांची  नाळ  ही आईशी म्हणजेच अमिनाच्या नाळेशी  जोडलेली नव्हती. हें पाहून त्या दाई ला धक्का बसला.त्याशिवाय प्रसूतीच्या वेळी सर्व महिलांना रक्तस्त्राव होतो परंतु मोहम्मद यांच्या जन्मावेळी त्यांच्या आई अमीना यांना अजिबात रक्तस्त्राव झाला नाही. तिसरी बाब म्हणजे मोहम्मद पैगंबर यांचा जेंव्हा जन्म झाला तेंव्हा त्यांचा  "खतना"  झालेला होता. मुस्लिम धर्मात  मुलं जन्मल्यानंतर  किंवा काही काळानंतर त्या मुलाचा "खतना" करावा लागतो . परंतु जन्मवेळीच मोहम्मद पैगंबर यांचा खतना झालेला होता.  धक्कादायक बाब ही की मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मावेळी त्यांच्या पाठीवर एक चिन्ह (मोहर) होते. "नबी"( प्रेषित) होण्याची ती खूण होती . तसे चिन्ह  सर्वसाधारण कोणत्याही मुलांना नसते . प्रसूती वेळी हालिमा शिफा नावाच्या एक  दाई (नर्स) अमीना यांच्याजवळ होत्या.  हजरत मोहम्मद पैगंबर यांचा  जन्म झाल्याबरोबर जेंव्हा अमीना  मोहम्मद यांना एका कडेवर   झोपवत होत्या,तेंव्हा त्या हालीमा  "अचंबित" झाल्या. कारण अमीना यांनी जेंव्हा जमिनीवर झोपवताना  मोहम्मद पैगंबर उठून  अल्लाह ला स्मरुन जमिनीवर गुडघे टेकवत सजदा केला. 15 मिनिटे ते तशाच अवस्थेत होते . त्यानंतर आकाशाकडे बोट  दाखवत जणूकाही अल्लाह  "एक" आहे, तोच जगाचा निर्माता आहे असे सांगितले.

मोहम्मद  पैगंबर जन्मल्यानंतर काही वेळाने ढगांचा   एक भाग जवळ आला. अमीना यांच्या कडेवरील मोहम्मद पैगंबर  यांना घेऊन गेला. ढगातुन आवाज आला  ए जिब्राइल  मोहम्मद पैगंबर यांना याआधी आलेल्या नबींच्या जवळ घेऊन जा,त्यांना हजरत "युसूफ"  यांची सुंदरता, हजरत "आयुब" यांची सहनशिलता, हजरत "इब्राहिम" यांची मैत्री द्या , हजरत "दाउद" यांची गोड वाणी द्या ,मोहम्मद पैगंबर  यांना संपूर्ण जगाची स्वारी करा, काहीवेळानंतर  तो ढगांचा पुंजका  पून्हा एकदा अमीना यांच्या कडेवर ठेवून  निघून गेला. 

मोहम्मद पैगंबर  जेंव्हा 2 महिन्याचे होते तेंव्हा मोहम्मद पैगंबर  जेंव्हा रडत असत तेंव्हा आकाशातील  चंद्र त्यांच्या हातांच्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचे  ,आजू - बाजूला होई. चंद्र त्यांना गोष्टी सांगायचा, चंद्र स्वतः त्यांचा खेळणे  होई, चंद्र त्यांच्याशी खेळत, "तारे" त्यांच्याशी खेळत. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मावेळी "इराण" मधील एक मोठी आग  विझली. त्या राजांने पुन्हा 11 काठ्या तयार केल्या. परंतु त्या देखील पडल्या. असे एक नव्हे तर हजारो( मोजजा) चमत्कार प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकाळात घडलेले आहेत.  

ज्यू आणि शत्रू समूहांनी जेंव्हा प्रेषितांच्या पाठीवर  "नबुवत" ची मोहर पहिली तेंव्हा ते चिडले, आणि आता  "वाईटाचा सर्वनाश" होणार आणि जगात  सुख - समृद्धी  चा अवतार येणार असे सांगत ते "त्रागा"  करत असत. 

वाईट प्रवृत्तीपासून संरक्षण आणि सर्वधर्मसमभाव ची जपणूक करण्याचे कार्य प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण आयुष्यात केले.

शांती ,सदभाव आणि एकोपा,परोपकार याची शिकवण देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जीवनशैली अनुकरणीय आहे .

आज जगाला याच विचारांची खरी गरज आहे.

आज "ईद ए मिलाद"  च्या सर्व भारतवासीयांना हार्दिक शुभेच्छा !


*इकबाल बाबासाहेब  मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक -  सांगली वेध ,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा