Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

*BSNL ने मोठ्या कंपन्यांची उडवली झोप ---अवघ्या 7 रुपयांचा छप्पर फाड प्लॅन?...*

 


*उपसंपादक --नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

बीएसएनएलने आता एक नवा भन्नाट प्लॅन आणला आहे. या प्लॅनअंतर्गत रोज सरासरी सात रुपये मोजून दिवसाला 3 जीबी डेटा वापरता येणार आहे.


BSNL या प्लॅनमध्ये एकूण 84 दिवसांची व्हॅलिडीटी आहे. या प्लॅनअंतर्गत अमर्याद कॉलिंग करता येते. तसेच रोज 100 SMS पाठवता येतात. विशेष म्हणजे या प्लॅनअंतर्गत रोज 3GB डेटा वारपायला मिळतो. म्हणजेच 599 रुपयांत 84 दिवस सेवा देणारा हा प्लॅन उत्तर इंटरनेट स्पीड देतो. विचार करायचा झालाच तर प्रत्येक दिवसाला फक्त 7.13 रुपये देऊन रोज 3 जीबी डेटा वापरण्याची संधी BSNL ने दिली आहे.


BSNL कंपनीकडून आपली इंटरनेट सुविधा सुधारण्यासाठी तसेच या सुविधेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या कंपनीकडून एक 4G डेटा सेंटर उभे केले जात आहे. टाटा उद्योग समुहाच्या मदतीने हे डेटा सेंटर उभारले जात आहे. 


या डेटा सेंटरच्या मदतीने बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या सुविधेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा