*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;-9730 867 448*
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार म्हणून परिचित असलेले अशोक भाऊ जगदाळे यांच्यातर्फे करजखेड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात काल (२२ सप्टेंबर) भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख आणि कृषिरत्न तथा ऊस उत्पादन तज्ञ डॉ. संजीव माने यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला मा. श्री. अशोक जगदाळे यांच्याकडून शेती उपयोगी साहित्य देण्यात आले. तसेच 51 भाग्यवान शेतकऱ्यांना (सोडती द्वारे) लकी ड्रॉच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे उपकरण आणि साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
या भव्य शेतकरी मेळाव्याला करजखेड आणि आसपासच्या पाच ते दहा गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. मेळाव्यात पंजाबराव डख यांनी मराठवाड्यात पुढील काळामध्ये कशा पद्धतीचे वातावरण असेल, शेतकऱ्यांनी पेरणी करताना काय काळजी घ्यावी तसेच हवामान कसे ओळखावे पाऊस कधी आणि किती होणार यासंदर्भातले मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. तसेच सांगली येथील ऊस तज्ज्ञ डॉ. संजीव माने यांनी मराठवाड्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या ऊस या पिकासाठी मातीचे परीक्षण का महत्वाचे आहे, पेरणी पासून ते काढणीपर्यंत काय काय काळजी घ्यावी तसेच संभाव्य रोगांची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऊस लागवड करताना उसाचे उत्पादन कसे वाढवावे यासंदर्भात शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा