*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451
निगाहे करम फाउंडेशन-ताज ग्रुप बार्शी यांच्या वतीने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या (ईद ए मिलाद) जयंतीनिमित्त नात पठणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, हे चौथे वर्ष होते. यात बार्शीतील ३० मुलांनी सहभाग नोंदविला होता. यात प्रथम क्रमांक- अरहान अमज़द शेख, द्वितीय क्रमांक- हुमेरा गुलमोहम्मद आतार, तृतीय क्रमांक-अलिजा अन्वर सय्यद तर चौथा क्रमांक- तंजिला रहेमत काझी यांचा आला यांना अनुक्रमे सायकल, मोबाईल घडी, स्टडी चिअर्स व स्कुल बॅग ट्राफी व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रत्येक मुलाला भेट वस्तु देण्यात आली. यासाठी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम पठाण, बिलाल तांबोळी, बबलु शेख, शाहबाज शेख, शाहरुख शेख, बबलु तांबोळी, अल्ताफ मणियार, शानु मुल्ला यांनी सहकार्य केले तर मौलाना खालिद रजा, निगाहे करम फाउंडेशनचे अध्यक्ष अरबाज इस्माईल पठाण, उपाध्यक्ष निहाल आतार, आलिम तांबोळी, महामुद बाबुडे, सैफुल पठाण, आवेश आतार, सोहेल मोमिन, शाजिल शेख व इतरांनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा