Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

*ढाणकी व कृष्णापुर फाटा येथे" राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी*

 


*ढाणकी---प्रतिनिधी*

 *दिगांबर शिरडकर*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी कृष्णापुर फाटा व ढाणकी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली . कृष्णापुर फाटा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजन करून माला अर्पण करण्यात आली. तदनंतर लागलीच ढाणकी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. येळकोट येळकोट जय मल्हार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी कृष्णापूर नगरीचे माजी सरपंच के. डी. हुलकाने,दिगांबर वैद्य, आनंदा कांगटे,पत्रकार विनोद गायकवाड,खंडेराव लकडे,समाधान हातमोडे व समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते. *चौकट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य नुसत्या एकट्या धनगर समाजा पुरते नव्हते तर सकल हिंदू समाजासाठी त्यांचे योगदान आहे. अनेक मंदिराचा जिर्णोद्धार , विहिरी, बारव व रस्ते सुद्धा त्यांनी बांधले.आज जे अनेक मंदिर उभे आहेत ते त्यांच्या शौर्य व कार्यामुळे आहेत. त्यांची जयंती प्रत्येक शहरात गावागावात,तसेच घरोघरी साजरी करण्यात यावी.* *के . डी . हुलकाने माजी सरपंच कृष्णापुर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा