Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

*सर्वच पक्षांना बंडखोरीची धास्ती असल्याने- अनेकांची उमेदवारी शेवटच्या 48 तासात घोषित होण्याची शक्यता?...*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. २०१९ च्या निवडणुकीत दिसलेली राजकीय समीकरणे या पाच वर्षांत पूर्णपणे बदलून गेली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट पडले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी मधून फुटून निघालेला एक गट हा भाजपाबरोबर सत्तेत आहे. तर दुसरा गट हा काँग्रेस, ठाकरे गटासोबत विरोधी पक्षात आहे. यामुळेच आता तीन-तीन पक्षांची महायुती तसेच महाविकास आघाडी झाली आहे. यामध्ये विधानसभेचे उमेदवारी कोणत्यातरी एकाच पक्षाला मिळणार आहे. मात्र त्या भागातील दुसरे इच्छुक हे बंडाच्या मार्गावर असणार आहेत. 


संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. उमेदवारी उशिरा घोषित करून संभाव्य बंडखोरांना बंडखोरी करण्यासाठी वेळच मिळू नये असा काहीसा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांचा असणार आहे. अनेकांची उमेदवारी जाहीर करताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर करू नये अशा प्रकारची विशेष स्ट्रॅटर्जी आखली जात आहे.                       


ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन किंवा तीन प्रबळ दावेदार आहेत, त्या ठिकाणी बंडखोरी होऊ शकते. ज्यांना उमेदवारी नाकारली गेली, त्यांची समजूत काढण्याचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये पक्षश्रेष्ठींचे दूत पदाधिकाऱ्यांकडून समजूत काढली जात असल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय, ज्या ठिकाणी बंडखोरी होणार आहे, त्या मतदारसंघात तो किती मते घेईल, त्याचा पक्षाच्या उमेदवाराला किती फटका बसणार, याचेही विश्लेषण केले जात आहे. त्यानंतर पुढील रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा