*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कवी इंद्रजीत पाटील लिखित कळ पाेटी आली आेठी या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहास पहिला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार - २०२४ ने त्यांना स्वातंत्र्यसेनानी राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंतीचे आैचित्य साधून म्हणजेच ३० नोव्हेंबर राेजी सन्मानित करण्यात येणार आहे.शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व वृक्षाचे राेप असे पुरस्काराचे स्वरूप असून आसू,ता.फलटण,जि.सातारा याठिकाणी भरगच्च कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.याआधीही मराठी साहित्यातील चाैफेर लिखाणासाठी त्यांना बरेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.सदर अष्टाक्षरी कवितासंग्रहाची प्रस्तावना सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर घराण्यातील डाॅ.अनिता खेबूडकर यांनी लिहिली असून मलपृष्ठावरती अभिप्राय .श्रीकांत पाटील सरांनी दिला आहे.तर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध कवी व गीतकार .विष्णू थोरे यांनी रेखाटले आहे.प्रस्तुत कवितासंग्रहाने मराठी साहित्य विश्वाला माेठा दस्तावेज दिला आहे.असे डाॅ.अनिता खेबूडकर मॅडमचे मत आहे. .प्रकाश सकुंडे गुरुजींच्या परीक्षक मंडळाने अगदी पारदर्शकपणे निवड करून या कवितासंग्रहास प्रथम क्रमांक देऊन याेग्य न्याय दिला आहे. कवी इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल पंडितराव लाेहाेकरे, चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख व राकेश गरड यांनी विशेष अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा