Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

*तुळजापूर चे विद्यमान आमदार यांच्या खाजगी पी ए यांनी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही?*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

रविवार दि. २०/१०/२०२४ रोजी सकाळी ९.२५ मिनिटानी विद्यमान आमदाराचे  खाजगी पी. ए यांनी अभिषेकाच्या वेळी व्हीआयपी नेहलेले असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी

अमोल शिवाजीराव जाधव,( निष्ठावंत शिवसैनिक उध्दव ठाकरे गट) रा.तुळजापूर जि. धाराशिव मो.नं.७८७५२९६१११ यांनी व्यवस्थापक तथा तहसीलदार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

याबाबत निवेदनात केलेली सविस्तर तक्रार अशी की रविवार, दिनांक २०/१०/२०२४ रोजी सकाळी ९.२५ मिनिटानी आमदारा चे खाजगी पी.ए.ने अभिषेकाच्या वेळी व्हीआयपी हे दर्शनास नेहलेले होते, तरी सद्यस्थितीत विधानसभा निवडणूक 2024 ची२४१ चे आदर्श आचार संहिता लागू आहे, तरी आमदाराचे पी.ए.नाव सुजित जमदाडे यांनी आचार संहिताचे भंग केला असून विशेष बाब म्हणजे व्हीआयपी रजिस्टरला नोंद न करता तसेच माणसे घेवून गेले, तरी विद्यमान आमदाराच्या  पी एस वर आचार संहितेचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली असून अद्याप त्याच्यावर कारवाई केली नसून हा सरासरी आचारसंहितेचा भंग असताना कारवाई का केली नाही असाही प्रश्न त्यांनी केला आहे



अर्जदार

श्री. अमोल शिवाजीराव जाधव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा