*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
आपले सरकार केंद्र द्वारा शहाराबरोबर ग्रामीण भाग पण होत आहे डिजिटल.
आज सर्व ठिकाणी डिजिटल सुविधा चालू झाल्या आहेत. त्यात ग्रामीण भागात शासकीय योजना पुरवण्याचे महत्वाचे कार्य आपले केंद्र (CSC VLE)चालकांच्या माध्यमातून होत असते.
शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे त्याची माहिती देणे तसेच ऑनलाईन फॉर्म भरून लाभ मिळवून देणे. शासकीय उतारे तसेच शेती समंधी 7/12, 8अ फेरफार यांसारख्या सुविधा तर होत्याच त्यात शेतकरी वर्गास शेतीसाठी कर्ज, ट्रॅक्टर साठी कर्ज, गाय गोठा कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोने तारण, बँकेतून पैसे काढणे टाकणे अशा बँकिंग सुविधा आपल्या जवळ उपलब्ध झाल्याने वेळ व पैसा या दोन्हीची बचत होत आहे.
अशाच सुविधा HDFC च्या माध्यमातून ग्रामीण भागात पुरवल्या चा गौरव म्हणून CSC व HDFC अकलूज बँक यांच्या माध्यमातून ट्रॉफी देऊन श्री. हुसेन मुबारक तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बँकेचे ब्राचं मॅनेजर.. एरिया हेड - सुनील गोडसे सर,... बालाजी सर उपस्थित होते.
आलिया एंटरप्रायस, ग्राहक सेवा केंद्र सराटी चे 24/11 या दिवशी 5वे वर्धापन दिन आहे. त्या आधीच त्यांना केलेल्या कार्याचा गौरव झाल्याने HDFC बँक तसेच शासनाचा अभिनव उपक्रम आपले सरकार केंद्र याचे त्यांनी आभार मानले. या पुढेही अजून सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा