*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
दि८/९/२०२४ रोजी अमोल शिवाजीराव जाधव शिवसेना हे जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना भेटावयास आले असता अमोल जाधव हे जिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्ये बसले असता नागेश शितोळे यांनी कंपनीच्या विरोधातील अर्ज मागे घ्या म्हणून लाज घेऊन आमिषाला बळी पाडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी संस्थान चे अध्यक्ष यांचेकडे निवेदनाद्वारे केले आहे
याबाबत व्यवस्थापक यांच्या बाबत निवेदनाद्वारे केलेली मागणी अशी कि
मी आपल्या दिनांक १/९/२०२४ रोजी मंदिराच्या विषयी मी आपणास निवेदन देण्यास आलो होतो, आपणास भेटल्यानंतर मला परत भेट देतो म्हणाल्यानंतर मी बाहेर बसलो होतो. तेथे नागेश शितोळे आले, त्यांनी काही कंपनीच्या विरोधातील अर्ज माघार घ्या म्हणून मध्यस्थी करण्यासाठी मला अमिष दाखविले व कलेक्टर साहेबाचा मी जवळचा आहे, मला कलेक्टर त्यांच्या खास कामासाठी मला हैद्राबादला पाठविले होते. मी सर्व अधिकारी, पुढारी यांच्या मर्जीतला असून मी सांगेल तोच निर्णय मंदिरामध्ये होतो असे सांगून वेळोवेळी मला अमिष दाखविले, आपल्या सिसिटीव्ही कॅमेरामध्ये कैद्य असून आपण तो सिसिटीव्ही कॅमेरा तपासून नागेश शितोळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केले आहे मात्र अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे या व्यवस्थापकाकडून सर्वसामान्य नागरिक व भाविकांनी काय अपेक्षा करावी अशी चर्चा होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा