*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार एकदिलाने काम करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील यांनी आज काँग्रेस भवन येथे झालेल्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
या बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अँड. राशीद शेख यांनी केले.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात बोलताना धवलसिंह मोहिते- पाटील म्हणाले की काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला विचाराची दिशा आहे. या विचारावरच पक्ष चालतो. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या
सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एक दिलाने काम करतील व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणतील आणि राज्यांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती भीमाशंकर जमादार, गुरुनाथ म्हेत्रे, जुगलकिशोर तिवाडी, राहुल पाटील, उपाध्यक्ष अशोकराव देवकते, प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुधीर लांडे, सरचिटणीस भीमराव बाळगे, उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे, अण्णासाहेब इनामदार, सेलचे अध्यक्ष वसीमभाई पठाण, नागनाथ कदम, तालुकाध्यक्ष शालिवाहन माने- देशमुख, डॉ.अरमान पटेल, विष्णु शिंदे, अरुणा बेजारपे, प्रशांत कांबळे, रजाक कादरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, जुगलकिशोर तिवाडी, तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, अभिषेक कांबळे, अमर सूर्यवंशी, हनुमंत मोरे, सतीश पाचकुडवे, किशोर पवार, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीमभाई पठाण, ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष संग्राम जाधव, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन अवताडे, उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष अरुणा बेंजारपे, जिल्हा सचिव मोहम्मद शेख, सिद्धू खरात, इसाक शेख, पंडित पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य संघटकपदी कय्युम बलोलखान, सोलापूर जिल्हा काँग्रेस मानवधिकार विभागाच्या जिल्हध्यक्षपदी डॉ.अरमान पटेल यांची निवड झाल्याबद्दल व सोलापूर जिल्हा काँग्रेस विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल रणखांबे यांनी वकिली परीक्षा पास केल्याबद्दल त्यांचे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी माजी तालुका अध्यक्ष गुरुनाथ म्हेत्रे, प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुधीर लांडे, सरचिटणीस भीमराव बाळगे, उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे, अशोकराव देवकते, सिकंदरताज पाटील, अमोल म्हमाणे, विष्णु शिंदे, विजय राठोड, अण्णासाहेब शिंदे, कांतीलाल राऊत, मुन्ना हरणमारे राहुल पाटील, लक्ष्मण भोसले, भीमराव बंडगर, मुबारक शेख,अँड. गजेंद्र खरात, तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप सतिश पालकर, नवनाथ साठे, अप्पू शेख, समीर कोळी, आदित्य फत्तेपूरकर, रंजीतसिंह देशमुख, रमजान नदाफ, धर्मराज पुजारी,अंजली वस्त्रे, अंजली मोहिते, उषा कोकाटे, विद्या कोळकर, नंदा कांबळे, आयोशा शेख,मैनाताई बनसोडे, राधिका कंगोरे, इसाक शेख, सुहास भाळवणकर, नागनाथ आढळराव, नागनाथ कदम, फिरोज देशमुख, मयूर माने, रावसाहेब होनमाने, अशोक पाटोळे, सलाम शेख, उमाशंकर रावत, दाजी कोकाटे, अक्षय शेळके, किरण सुर्वे, उमाकांत येरवडे ,राजेंद्र सर्जे, पांडुरंग साखरे, मालोजीराव देशमुख,नूरअहमद नालवार, देवेंद्र सैनसाखळे, मौलाली शेख, साजिद मकानदार आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा