Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

*सोलापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा 2024 तालुकास्तरीय" समूह नृत्य स्पर्धेत" तुपे वस्ती -प्रथम*


 

*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत  तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धा आदर्श केंद्र शाळा महाळूंग ता. माळशिरस  येथे संपन्न झाल्या. लहान  गटातील या स्पर्धेत जि. प. प्राथ. शाळा  तुपे वस्ती, मेडद  या शाळेने प्रथम क्रमांक मिळवत  जिल्हास्तरावर माळशिरस तालुक्याचे  प्रतिनिधित्व करण्याचा मान पटकाविला. 


   इ. १ ली ते ५ वी गटाच्या या समूहनृत्य स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा तांदुळवाडी आणि जि.प . प्रा. शाळा मुंडफने वस्ती यांनी  अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला तर  धानोरे आणि  पिलीव या शाळांना  उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पोतराज गीत, आराधी गीत, गोंधळ, शेतकरी गीत, प्रबोधन गीते, लोकगीते असे  अतिशय सरस नृत्यप्रकार याप्रसंगी सादर करण्यात आले 


        तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी  केंद्रप्रमुख दिलीप ताटे, प्र. केंद्रप्रमुख दगडू पवार, केंद्रीय मुख्याध्यापक बाळासाहेब साठे,  मुख्याध्यापक अशोक पवार, संजीवनी जाधव,नंदेश तिकोटे , बंडू खडतरे, सुभाष मिसाळ आदी शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अमोल मदाल, शिरीष खोत, बाळासाहेब खंडागळे, अमोल केंगार यांनी काम पाहिले . विजेत्या संघांना श्रीकांत मिसाळ यांचे कडून कै. त्रिंबक नारायण मिसाळ यांचे स्मरणार्थ चषक  प्रदान करण्यात आला.

    स्पर्धेचे सूत्रसंचालन गणपत जाधव आणि  प्रमिला गाडे यांनी तर  आभार  रेखा निर्मळ यांनी मानले. 


फोटो ओळी -विजेत्या ३ संघासमवेत केंद्रप्रमुख दिलीप ताटे, प्र. केंद्रप्रमुख दगडू पवार, केंद्रीय मुख्याध्यापक बाळासाहेब साठे, मुख्याध्यापक अशोक पवार, संजीवनी जाधव , बंडू खडतरे, शिक्षक भाऊसो देशमुख, अमीरपाशा शेख, गणपत जाधव इ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा