*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
येथील राणे परिवाराच्या ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी महात्मा फुले जनधन आरोग्य योजना सुरू केली असून या मोफत योजनेचा लाभ गोरगरीब बालक रुग्णांनी घ्यावा,असे आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव राणे यांनी केले.
याबाबत डॉ.राजीव राणे म्हणाले की,बालकावस्थेतील रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत.गोरगरीब पालकांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया,उपचार करता येत नाहीत.अशा पालकांच्या बाल रुग्णांवर शासन निर्धारित आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.त्यासाठी रेशन कार्ड, बालरुग्णांचे आधारकार्ड, जन्माचा दाखला अथवा रुग्णालयात जन्मल्याचा दाखला आदी कागदपत्रे दाखल करणे आवश्यक आहे कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर ७२ तासांच्या आत शासनस्तरावर मंजुरी घेऊन उपचार करण्यात येतील.अशी माहिती डॉ.राजीव राणे यांनी दिली.यावेळी डॉ.नितीन राणे डॉ.मनीष राणे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा