Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

*अंधांना दिव्यदृष्टी देणारा कार्यक्रम-- गीत भगव्दीता संपन्न*

 


*अकलूज प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

श्री साईबाबा होम फॉर एजेड ब्लाईंड वुमन या पुणे येथील, नांदेड फाटा परिसरात अंध महिलांसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे अविरत कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये संग्रामनगर (ता.माळशिरस) येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिराचे, श्रीराम कृपा भजनी मंडळाने अतिशय श्रवणीय असा भगवत गीता तत्त्वज्ञानाचे विविध पैलू उलगडून दाखविणारा गीत भगवद्गीता हा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमात सर्वच अंध महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. 

         पद्मश्री समाजभूषण श्री निरंजन पांड्या यांनी १९८२ मध्ये अंध महिलांच्या जीवनात आशेचा उषःकाल निर्माण करण्यासाठी श्री साईबाबा होम फॉर एजेड ब्लाईंड वुमन या संस्थेची पुणे येथे स्थापना केलेली असून या संस्थेच्या माध्यमातून प्रामुख्याने नेत्रदान सारखे सामाजिक उपक्रम राबविले जात असून अंध महिलांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येत आहे.प्रत्यक्षदर्शी या संस्थेतील महिला आपले अंधत्व विसरून गेलेल्या दिसून येत होत्या.या संस्थेच्या माध्यमातून त्यांना एक दिव्य दृष्टी मिळाल्या सारखे वाटत असून जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास या संस्थेने या अंध महिलांना मिळवून दिलेला आहे. 

           गीता धर्म प्रसारक मंडळाच्या,महाराष्ट्र ग्रामीण भागाच्या अध्यक्षा सौ.संध्याताई कुलकर्णी पुणे या संस्थेसाठी व संस्थेतील अंध महिलांसाठी सर्वतोपरी सहाय्य करीत असून या अंध महिलांना त्यांच्याकडून मातेचे प्रेम मिळत आहे. 

              या अंध महिलांना भगवद्गीता समजावी म्हणून त्यांनी श्रीराम कृपा भजनी मंडळाच्या संस्थापिका डॉ. मुग्धाताई तांबे यांना श्री साईबाबा होम फॉर एजेड ब्लाइंड वुमन या संस्थेमध्ये गीत भगवद्गीता कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.त्याप्रमाणे डॉ.मुग्धाताई तांबे यांनी या अंध महिलांसाठी भागवत गीतेच्या माध्यमातून नवदृष्टी मिळावी, त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून या गीत भगवद्गीता या अतिशय श्रवणीय प्रबोधनीय अशा कार्यक्रमाचे नियोजन केले होते. हा कार्यक्रम इतका उद्बोधक झाला की,या अंध महिला पैकी एक मीनाताई यांनी आपल्या मनोगतामध्ये हृदयापासून सादर केलेला कार्यक्रम आमच्या हृदयापर्यंत पोहोचला.असे विचार व्यक्त केले.गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या गायनानंतर या अंध महिलांनी दिलेली उत्स्फूर्त दाद व टाळ्यांचा कडकडाट हा या कार्यक्रमाचे यश समजण्यात येते.श्रीराम कृपा भजनी मंडळाच्या संस्थापिका डॉ. मुग्धाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हार्मोनियम वादक,गायन विशारद सौ.अमृता ताई अडगळे व तबला वादक संगीत विशारद गोपाळ अडगळे यांच्यासह या भजनी मंडळाच्या तीस महिलांनी या गीत भगवद्गीता कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता.

             या कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सौ.संध्या ताई कुलकर्णी यांनी सांगितले की,डॉ.प्रदीप आगाशे रचित गीत भगवद्गीता हा कार्यक्रम अतिशय श्रवणीय व प्रबोधक असा आहे. व या भगवद्गीतेतील गीतांना डॉ. मुग्धाताई तांबे यांनी,त्यांचे श्रीराम कृपा भजनी मंडळाच्या माध्यमातून सुंदर असा स्वरसाज चढविलेला आहे.त्यामुळे या गीत भगवद्गीतेचा कार्यक्रम अतिशय श्रवणीय झालेला असून काही गीते तर परत परत ऐकावीशी वाटतात.हे या कार्यक्रमाचे यश आहे.महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे कार्यक्रम व्हावेत.त्यासाठी मी गीता धर्म प्रसारक मंडळाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करीन.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा