*ज्येष्ठ ---पत्रकार*
*बाळासाहेब गायकवाड*
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.संपुर्ण महाराष्टात निवडणुक वातावरण तापले आहे.माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील आरपीआय आठवले गटाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत ते निवडणुक लढवणार असल्याने आरपीआय कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.माळशिरस तालुका विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे सदर जागा आरपीआयला सोडण्यात यावी अशी मागणी आरपीआयचे वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महायुतीत आरपीआय आठवले गट आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीकडे आरपीआयला नऊ ते दहा जागा सोडण्याची मागणी केली आहे मात्र अद्याप आरपीआयला किती जागा सोडण्यात आल्या आहेत हे महायुतीकडून जाहीर करण्यात आलेले नाही.माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा स्थानिक उमेदवारांना निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना सोडला जावा अशी आग्रही मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे शामराव भोसले हे गेली चाळीस वर्षे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तसेच दलित पँथरचे सुरूवातीपासून ते रामदास आठवले राजाभाऊ सरवदे यांचें बरोबर सक्रिय आहेत आरपीआयचे वतीने छेडण्यात आलेल्या अनेक आंदोलने मोर्चे सभा अधिवेशनात त्यांनी सहभाग घेतला आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माळशिरस तालुक्यातील विधानसभा निवडणूक लढवणार अशी ग्वाही शामराव भोसले यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा