*पत्रकार ---इक्बाल बाबासाहेब मुल्ला--(सांगली)
काँग्रेस चे माजी आमदार आणि अभिनेता सलमान खान चे मित्र - हितचिंतक बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडात ज्याचे नावं प्रामुख्याने समोर येत आहे त्या लॉरेन्स बिष्णोई याला वाचवण्यासाठी भारतातील केंद्र पातळीवरील मोठी "शक्ती" कार्यरत आहे असे दिसते.
ज्या बिष्णोई गँग ने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली त्याला "कस्टडी" मध्ये घेण्यासाठी "मुंबई" चे पोलीस मोदींच्या गुजरात मध्ये गेल्यावर, साबरमती जेल मधून त्याचा ताबा देण्यास "नकार" देण्यात आला.
बदलापूर मध्ये ज्या नराधम अक्षय शिंदे. याचा पोलिसांनी एन्काउंटर केला तसा एन्काउंटर पोलीस करतील याची भीती भारताचे गृहमंत्री अमित शहा. यांना असावी का ??? गुन्हेगाराला शिक्षा अथवा पोलीस "चौकशीसाठी" घेऊन जाताना "गृहखात्याचा" यांचा विरोध का असावा ??? लॉरेन्स बिष्णोई वर वरदहस्त कुणाचा आहे ?? अमित शहा यांच्या गुजरात मध्ये, बंदरावर पाकिस्तानचे अब्जावधी रुपयांचे ड्रग्ज सापडते, त्याची तस्करी बिष्णोई गँग करतो त्याला अप्रत्यक्षपणे गृहखाते. का वाचवत आहे ?? त्याला का संरक्षण देत आहे ?? त्याला कारागृहात 8आलिशान खोल्या देऊन, जिम ची व्यवस्था करून सुरक्षित पणे साबरमती जेलमध्ये ठेवले जाते. ..आणि माजी आमदार स्व. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या खुन्यावर दया दाखवली जाते. हा "अन्याय" नाही का ??? आत्तापर्यंत त्याने एक नव्हे दोन नव्हे तर "डझनावर" हत्या केल्या आहेत.आज किरकोळ गुन्हेगारांचा एन्काउंटर केला जातो मग बिष्णोई वर इतकी "मेहरबानी" का ??? कारागृहात मोबाईल वापरणे "गुन्हा" असताना,त्याला मोबाईल ची "सुविधा" कशी मिळते ??? व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून त्याचे गॅंगवार भारत ,कॅनडा, आफ्रिकन देशात चालत असेल तर त्याच्यावर रिमोट कोणाचा आहे ??? बिष्णोई ला "मोठे" कोण करत आहे ???
ज्या कॅनडा मध्ये खलिस्थानी व्यक्तीच्या हत्येची सुपारी. देण्यात येते, तेथे देखील लॉरेन्स चे नावं येते, सिद्धू मुसेवाला याला गोळ्या घातल्यावर बिष्णोई चे नावं येते, मुसेवाला याला ज्या "पिस्टल" ने गोळ्या झाडल्या गेल्या त्या AK 47 प्रकारातल्या" आणि अतिशय आधुनिक. बंदुकीतून गोळ्या झाडल्या ,ज्या पोलिसांकडे देखील नाहीत त्या बिष्णोई कडे कशा "उपलब्ध" झाल्या ?? जो पाकिस्तान. आपल्या भारताचा शत्रू आहे, तेथूनचं ही "आधुनिक शस्त्रे" तस्करीच्या माध्यमातून भारतात येतात आणि भारताचे पंतप्रधान आणि भारताचे गृहमंत्री"हात झटकून" मोकळे होतात. हेच यांचे भारतावरील प्रेम का ?? बिष्णोई गँग अब्जावधी ड्रग्ज भारतात आणून भारतातील तरुण आणि "तरुणाई" विषारी विळख्याने नष्ट करू इच्छिते त्या बिष्णोई वर कडक "कारवाई" का होत नाही ?? ड्रग्जचे भारतात
जेवढे ड्रग्ज "गुजरात" मध्ये सापडले त्याच्यापेक्षा जास्त ड्रग्ज "बाजारात" असेल असा अंदाज व्यक्त होताना दिसतं आहे. आणि या विषारी खेळाचा म्होरक्या बिष्णोई असला तरी या खाडीवर राज्य आहे अदानीच्या कंपनीचे. कारण ती खाडी नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांची आहे.
तर आता संशय कुणावर घ्यायचा ?? आणि काय घ्यायचा ???
बाबा सिद्दीकी यांची हत्या "फिल्मसिटी" वर वर जरब बसवण्यासाठी झाली आहे. करोडो रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी अभिनेते - अभिनेत्री यांना भीती घालण्यासाठी ही एक कूटनीती आहे.
जर बिष्णोई आपल्या 700 हस्तकांकरवी हत्यांचे सत्र सुरु ठेवत असेल ,भारत सरकार त्याला साबरमती. जेलमध्ये "सुरक्षित" ठेवत असेल आणि भारताचे गृह खाते मूग गिळून गप्प बसत असेल तर माझ्या या भारताचे "भवितव्य" काय असेल ??? कोणाच्या इशाऱ्यावरून हा खेळ सुरु आहे ?? बिष्णोई ला फूस कोणाची आहे ??
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा