Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

*माळशिरस विधानसभा मतदार संघातील "वंचित बहुजन आघाडी"चा 'उमेदवार' बदलून मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे जाहीर राजीनामे*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याने वंचित चां जाहीर उमेदवार श्री. राज कुमार हे बदलून मिळावा यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली मात्र वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर राजीनामे दिले आहेत.

          यावेळी माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपुर, पिलिव,अकलूज,चांदापुरी,बचेरी आदी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांनी राजीनामे सादर केले तसेच २३ आक्टोंबर रोजी नवनियुक्त १० पैकि ५ पदाधिकरी यांनी जाहीर राजीनामे दिले आहेत.हे सर्व राजीनामे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना सादर केला असून त्यामध्ये वरिष्ठांनकडून गळचेपी होत असल्याने निषेध म्हणून राजीनामे देत असल्याचे नमूद केले आहे.


          या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड.सुमित सावंत,जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शिकलगार,माजी तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड,मा.तालुका उपाध्यक्ष समाधान साबळे,अक्षय देठे,लिंगेश्वर सातपुते,सागर सरतापे,विकास दळवी,मनोज जगताप,सुहास गायकवाड,शुभम वाघमारे, सुनील कांबळे,आदर्श गायकवाड,अजय कांबळे,जय खरे,कुंडलिक कांबळे,रामजी लोंढे, मनोज जगताप आदि सह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा