Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

*श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरूड च्या वतीने गरीब बांधकाम कर्मचाऱ्यांना दिवाळीचे "किट" वाटप*

 


*विशेष ---- प्रतिनिधी*

  *राज ----मुलाणी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो.840881733

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय कोथरुड पुणे येथे आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी विद्यालयात दिवाळी शुभेच्छा कार्यक्रमांतर्गत विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका .जयश्री जावळे यांच्या संकल्पनेतून बांधकामावर काम करणाऱ्या चार कामगार कुटुंबाला विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या वतीने दिवाळी निमित्त साखर, तांदूळ,रवा , हरभरा डाळ,तूर डाळ,मोती साबण,तेल,पणती,उटणे असे साहित्य व लहान मुलांना फुलभाजा,मेहेंदी व खाऊ देण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी खुपचं छान प्रतिसाद दिला.तसेच विद्यालयातील शिक्षक .पठाणसर ,.कारोटेसर,.खंडागळे सर,चौधरी सर आत्राम सर तसेच सेवक .बावीसकर व निळकंठ या सर्वांचे सहकार्य मिळाले.

अशा स्तुत्य उपक्रम बद्दल विद्यालयाच्या मा.सभापती ॠतुजादेवी संग्रामसिंह मोहिते पाटील व सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा