*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस विधानसभा निवडणुकीचे अधिसूचना जारी झाल्यापासून चौथ्या दिवशी शुक्रवारी २५ ऑक्टोंबर रोजी ७ जणांनी १३ नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे तर चौथ्या दिवशी एक जणाने उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.तर चौथ्या दिवसा अखेर एकूण ४२ जनाने ६३ नामनिर्देशन पत्रांचे खरेदी केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी २८ नामनिर्देशन पत्रांचे विक्री झाले आहे तर दुसऱ्या दिवशी बुधवारी १६ अर्जांचे विक्री झाली तर तिसऱ्या दिवशी ६ अर्जांचे विक्री झाले तर चौथ्या दिवशी १३ अर्जांची विक्री झाले म्हणजे हे एकूण ४२ जणाने ६३ अर्ज खरेदी केले आहेत.प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात उमेदवाराच्या फक्त तीन वाहनांना प्रवेश मिळणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील उमेदवारांसह फक्त चार जणांना प्रवेश दिला जात आहे.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात चौथा दिवशी अपक्ष उमेदवार शरद गेना सावंत यांनी एकच फॉर्म भरला आहे.
निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार निवडणुकीचे अधिसूचना २२ ऑक्टोंबर पासून जारी करण्यात आले.या दिवसापासून मतदार संघात उमेदवारी अर्ज विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. २९ ऑक्टोबर पर्यंतच उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात सुट्टीच्या दिवशी अर्ज विक्री किंवा स्वीकारणे बंद राहणार आहे.३० ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे तर ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा