*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
बार्शी तालुक्यात विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळी लाट दिसणार आहे
त्याचा प्रत्यय आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उमेदवाराच्या निमित्ताने आनंद काशीद यांना आला
सातत्याने मनोज जरंगे पाटलांच्या सोबत अमर उपोषण करणारे आनंद काशीद यांनी उमेदवारी अर्ज बार्शी विधानसभेला भरावा याकरिता त्यांना गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी वर्गणी करून दिली आणि त्या वर्गणीतून विधानसभा निवडणुकीचे डिपॉझिटची रक्कम ही भरली त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये बार्शी तालुक्यामध्ये "वेगळा पर्याय वेगळी लाट या तालुक्यामध्ये दिसत आहे असे चित्र निर्माण झाले आहे
प्रमाणिकपणे काम करणाऱ्या आणि मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या आनंद काशीद यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनीच येणाऱ्या विधानसभेला उमेदवारी अर्ज भरावा अशी समस्त मराठा समाजाची इच्छा होती त्यांच्यासाठी समाजातील गोरगरीब कष्टकऱ्यांनी मदतीचा हातभार म्हणून ही डिपॉझिट ची रक्कम आम्ही त्यांना देत आहोत असे सांगितले
अरुण घायतिडक, रवींद्र मुठाळ, विक्रम घायतिडक, शंकर देशमुख, नामदेव घायतिडक, अविनाश लोंढे, गुणवंत देशमुख, या सर्वांनी वर्गणी करून आंनद काशीद यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करा याकरिता डिपॉझिटची ही रक्कम आम्ही तुम्हाला देत आहोत परंतु या पुढच्या काळामध्ये तुमच्या हातून गोरगरिबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामे व्हावी हीच माफक अपेक्षा आहे आणि तुम्ही यापूर्वी केले आहेत आणि यापुढे कराल हे देखील आत्मविश्वास आम्हाला असल्यामुळे आम्हीही मदत तुम्हाला करत आहोत असा आत्मविश्वास समस्त मराठा समाजातील गोरगरीब नागरिकांनी दाखवला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा