Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

*भारताच्या राजकारणात" राहुल गांधी "किंगमेकर -ठरणार तर' नरेंद्र मोदी 'यांच्या जादूचा "अस्त"*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला ---(पत्रकार )सांगली*

*मोबाईल 8983 587 160

ज्या हरियाणा ने सर्वप्रथम 2014 ला नरेंद्र मोदी यांना साथ देऊन भारतामध्ये भाजपाची हवा केली होती, त्याच हरियाणा मध्ये, हरियाणाची जनता /शेतकरी यांच्याकडुन भाजपचा सुफडासाफ होण्याचे स्पष्ट "संकेत" आज प्राप्त होत आहेत. EVM मशीन मध्ये छेडछाड आणि सत्तेचा दुरुपयोग झाला तरचं भाजपा पुन्हा "सत्तेत" येऊ शकेल, अन्यथा नाही हें त्रिवार सत्य आहे.

त्याशिवाय जम्मू काश्मीर मध्ये देखील भाजपचे "पानिपत" निश्चित मानले जाते. आगामी महाराष्ट्रात देखील महायुती 100 जागेच्या आत थांबेल असे संकेत मिळत असून भाजपा - शिंदे गट आणि अजित पवार यांच्या विद्यमान "आमदारांशिवाय" महाराष्ट्रातील अनेक भक्कम नेते काँगेस - उद्धव ठाकरे -आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेस पार्टी मध्ये येण्यासाठी आतुर आहेत. परंतु त्यांना पक्षात जागा "शिल्लक" नाहीत . आज मोदी यांच्या जादूचा अस्त होत आहे हें आज प्रकर्षाने सिद्ध होत आहे.

ज्या भारताला हरियाणाने शत्रूंशी लढण्यासाठी सैनिक दिले त्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने लाठी चालवली, ज्या भारताला हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गहू आणि अन्नधान्य दिले त्या शेतकऱ्यांना भाजपा सरकारने चिरडले. ज्या हरियाणाने क्रीडा प्रकारात जगात भारताचे नावं "अजरामर" केले त्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना 3-3 महिने रस्तावर आंदोलन करावे लागले , त्यांना पोलिसांच्या काठ्या खाव्या लागल्या, ज्या महिला कुस्तीगिरांचा लैंगिक छळ झाला ,अत्याचार झाले त्यांचा मोदी सरकारने जाहीर सन्मान केला, त्यांना शिक्षा केली नाही, त्यांना "अभय दिले. ज्या हरियाणाने भारताला ट्रॅक्टर आणि "पोलादी मशिनरी" दिल्या त्या हरियाणाच्या कामगारांना - शेतकऱ्यांना - दलित - गरीब 746 लोकांना बंदुकीच्या गोळ्यांनी आहे ठार मारण्यात आले, ज्या जालियनबाग मध्ये स्वातंत्रविरांना गोळया घातल्या होत्या तसाच घृणास्पद प्रकार - हिंसा करण्यात आली.

आजदेखील दिल्ली मध्ये प्रवेश करण्यासाठी हजारो हरियाणा जनता थांबली असून त्यांना आत "प्रवेश" मिळत नाही. त्यामुळेच अशा अत्याचाराला उत्तर देण्यासाठी - शेतकरी - कष्टकरी यांना "न्याय" देण्यासाठी भाजपा सत्तेचे उच्चाटन करण्याचा "विडा" हरियाना च्या जनतेने उचलला आहे. त्यामुळेच यंदा मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांच्या जागा अडचणीत असून हरियाणा भारताच्या न्यायाच्या परिवर्तनाच्या यशोगाथेतील पाहिले राज्य ठरेल. आणि भाजपा आणि ईडी - सीबीआय या यंत्रणेच्या जोरावर देश चालवणाऱ्या शक्तींचा आता बिमोड़ होईल ! राहुल गांधी किंगमेकर !

आज काँगेस नव्हे तर "जनता विरुद्ध भाजप" अशी लढत हरियाणा मध्ये होत आहे. करोडो रुपये खर्च करून देखील भाजपचा सुफडासाफ हरियाना मध्ये निश्चित मानला जातो .भविष्यात भाजपच्या "अधोगतीची" ही सुरवात संपूर्ण भारतात आगीप्रमाणे रोद्र रूप धारण करेल यात तिळमात्र शंका नाही .

आज दलित - मराठा - मुस्लिम आणि सर्व जातींना घेऊन पुरोगामी भारत बनविण्याचा संकल्प काँगेस चे राहुल गांधी यांनी केला आहे .800 किलोमीटर भारत जोडो यात्रा करून त्यांनी सर्व समाजाला "जोडण्याचे" कार्य केले आहे.

भारताचे भविष्य. आता राहुल गांधीचं आहेत हें विरोधकांनी ओळ्खले असून मतांचे ध्रुवीकरण करण्याची आणि जातीयवाद पसरवण्याचे "षडयंत्र" काही लोकांकडून सातत्याने होत आहे.त्यामुळे अल्पसंख्यांक आणि दलित समाजाचे 100% मतदान भविष्यकाळात होणार असून "जातीवाद" कायमचा गाडून सर्वधर्मसमभावाचे ,

शांतीचे ,बंधुभावाचे , एकोप्याचे राज्य भारतात लाभेल अशी "आशा" करूया.

2024 प्रमाणे भविष्यात "राहुल गांधी" हेच नाणे भारतात नव्हे तर "जगभरात" चालणार हें निश्चित ! कोल्हापुरात दलित. बांधवांच्या घरात जेवण करणारा,सर्वसामान्य लोकांचे दुःख जाणणारा , सर्व गोरगरिबांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असणारा हा "योध्या" राहुल गांधी हें भविष्यातील भारताचे "पंतप्रधान" झाले तर आश्चर्य वाटू नये.


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा