Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

*अकलूजच्या 'अग्रजा ग्रुप "च्या वतीने आयोजित ऑनलाइन स्पर्धेत 'शिवानी गवसाने' ठरल्या महाविजेती*


 

*अकलूज प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

.,

अकलूज येथील अग्रजा ग्रुपतर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस नऊ साड्यांच्य रंगात महिलांनी रंगून आयोजित केलेल्या ऑनलाइन विविध स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त 

सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला.या स्पर्धेचा आज बक्षीस वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेत शिवानी गवसाणे या महाविजेतेपदाच्या मानकरी ठरल्या.त्यांना मानाचा मुकुट, साडी व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

        या स्पर्धेत सुमारे ३०० महिलांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्यांना सविता व्होरा व ॲड.आरती दीक्षित (पुणे) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धेत शिवानी गवसाणे यांनी सर्वसाधारण विजेतेपदाचा मुकुट,मानाची साडी व स्मृतिचिन्ह पटकाविले.तेजश्री कथले (द्वितीय,समई),राजश्री साठे (तृतीय,डबा सेट),उत्तेजनार्थ कादंबरी सूर्यवंशी यांनी भेटवस्तू मिळविल्या.



          या स्पर्धेतील पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गणेश स्तोत्र म्हणणे विजेती निशा कुरुडकर, दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून मराठमोळा लुक करणे व नवरात्रीची माहिती देणे विजेती राजश्री देशमाने,तिसऱ्या दिवशी करड्या रंगाचे वस्त्र परिधान करून भोंडला चित्र काढणे व भोंडल्याची गाणी म्हणणे विजेती सारिका गुळवे, चौथ्या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून ठिपक्यांची रांगोळी काढून विनोद सांगणे विजेती श्रद्धा इनामके,पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून नऊ रंगाचे पदार्थ करून सजावट करणे,१० म्हणी सांगणे विजेती स्नेहल भास्करे, सहाव्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवी अवतार धारण करून नृत्याचा फोटो पाठविणे विजेती विद्या शेटे, सातव्या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गरबा नृत्य करणे विजेती प्रशाली लोहकरे, आठव्या दिवशी गुलाबी वस्त्र परिधान करून सरस्वती मूर्ती निर्माण व पूजा करणे मंजुश्री गिराम,नवव्या दिवस जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुमारिका पूजन व मुलीच्या भविष्याविषयी मनोगत व्यक्त करणे विजेती स्नेहल नरुळे यांनी ऑनलाइन स्पर्धा जिंकून भेटवस्तू मिळविल्या.बक्षीस वितरण प्रसंगी संगीत खुर्ची व गरबा नृत्याने स्पर्धेचा समारोप करण्यात आला.



        अकलूज येथे अग्रजा ग्रुपच्या नवरात्री ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण सविता व्होरा, ॲड.आरती दीक्षित,अनुराधा लोहकरे,वृंदा अडगांवकर,आरती जडे व मुग्धा पोतदार यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सन्मानित सन्मान करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा