*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आमदार,खासदार यांच्या दोघांच्या मागणीला यश.
सहकाराच्या माध्यमातून प्रगतीपथावर असलेल्या माळशिरस तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मिनी औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आ.रणजितसिंह मोहिते पाटील व खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्याला यश आले असून माळशिरस तालुक्यातील येळीव येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिल्याचे पत्र प्राप्त झाले आहे .
आ.रणजीतसिंह मोहिते पाटील व खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई मंत्रालयात भेट घेवून मागणीचे पत्र दिले होते.या पत्रात माळशिरस तालुक्यात सुमारे ४ लाख ८५ हजार लोकसंख्या असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे.या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी माळशिरस तालुक्याच्या मध्यभागी माळशिरस,पुरंदावडे, येळीव व सदाशिवनगर जवळ शेती महामंडळाची सुमारे २१० एकर सलग जमीन आहे.या जमिनीवर मिनी औद्योगिक वसाहत उभा राहिल्यास शासनाला जमीन विकत घ्यावी लागणार नाही.तसेच येथे औद्योगिक वसाहत उभा राहिल्यास माळशिरस तालुक्यासह लगतच्या फलटण व माण तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल.ही जागा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर असल्याने दळणवळणा साठीही उद्योजकांना फायदेशीर आहे.त्यामुळे येथे मिनी औद्योगिक वसाहतीला मंजूरी मिळावी अशी मागणी दि.११ जुलै रोजी केली होती .
या मागणीचा विचार करुन शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार मंत्रालयाचे अप्पर सचिव किरण जाधव यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे मा.प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी झालेल्या १६६ व्या उच्चाधिकार समितीसमोर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.या बैठकीत उच्चाधिकार समितीने
माळशिरस औद्योगिक क्षेत्र मौजे माळशिरस येथे २९.१८ हे. आर क्षेत्र व मौजे येळीव येथील ३०.२९.८१ है. आर असे एकूण ५९.४७.८१ हे. आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम,१९६१ अन्वये कलम २ खंड (ग) च्या तरतूदी लागू करणेबाबत" दि . १४ ऑक्टोंबर रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे.या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इतिवृत्त अंतिम होण्याची वाट न पाहता पुढील आवश्यक कार्यवाही सत्वर करावी अशी सूचना केली आहे .
माळशिरस तालुक्यातील येळीव येथील शेती महामंडळाच्या जागेत औद्योगिक वसाहत होण्यास मंजुरी मिळाल्याने माळशिरस तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा