Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

* *18 उद्योगधंदे गुजरातला देऊन भाजप सरकार महाराष्ट्रातील* *मराठी माणसावर का करतोय अन्याय?*

 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार )*

*सांगली*

 *मो:-8983 587 167

महाराष्ट्राचा हक्काचा रोजगार हिरावला जातोय, आज महाराष्ट्रावर "अन्याय" होतोय, बेरोजगारीमुळे पिचलेला महाराष्ट्रातील युवक "हताश" आहे, भाजपा चे सरकार 18 उद्योगधंदे थेट गुजरात मध्ये "सप्रेम भेट" देतोय आणि महाराष्ट्रात तेच भाजपा आणि त्यांचे "उमेदवार" महाराष्ट्रातील विधानसभेसाठी त्यांना मतदान करण्यासाठी "विनंती" करतोय, खरंच हें "हास्यास्पद" नाही का ??? आज महाराष्ट्रातील जनतेमध्ये भाजपाविरोधी तीव्र *




असंतोष आहे. सांगलीत देखील माझ्याकडे "प्रतिक्रिया" दिलेल्या जनतेने हिच खदखद व्यक्त केली आहे.

आज महागाईचा आगडोंब उसळलाय, बेरोजगारी. वाढली आहे, जनतेकडे "पैसा" नाही,त्यांची क्रृर चेष्ठा करणाऱ्या, जनतेच्या पोटावर पाय मारणाऱ्या भाजप उमेदवाराला महाराष्ट्रातील "जनतेने" मतदान करायचे का ??

गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 15670 करोड रुपयांच्या योजनांचे "लोकार्पण" करत "रोडशो" करत आहेत ,आणी महाराष्ट्रातील जनता अन्नासाठी वणवण फिरत आहे ,"रोजगार" नसल्यामुळे दारोदार "भटकत" आहे आणि बेरोजगारीच्या "भस्मासुरामुळे" त्यांची "फरफट" होत आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब जनता गुजरात मध्ये नेलेल्या महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधी हिरावणाऱ्या भाजपा वर आज नकाश्रू ठाळत आहे. त्याच भाजपाला महाराष्ट्रातील जनता मतदान करणार का ?? 

आज नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरात मध्ये नेवून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळत तथाकथित महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या नरड्यावर नख ठेवत अक्षरशः महाराष्ट्राद्वेष "कृतीतून" सिद्ध करत आहेत. आणि महाराष्ट्रातील भाजपचे सरकार आत्तापर्यंत गुजरातने चोरलेल्या. 18 प्रकल्पाबद्दल ब्र शब्द बोलण्यास तयार नाही. किती घोर "शोकांतिका" आहे ही???

देवेंद्र फडणवीस ,अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील मिलियन डॉलर्स चे प्रकल्प गुजरात मध्ये जातं असताना "मूग" गिळून शांत असतात. 

आज महाराष्ट्रातील जनतेच्या लाखो संधी हिरावलेल्या जातं असताना सत्तेचा "माज" आलेल्या आणि सत्ता म्हणजेच "सर्वस्व" असे मानणाऱ्या या राजकारण्यांना जनतेच्या हिताचे काहीही "स्वारस्य" नाही. आज महाराष्ट्रात नवनवीन उद्योगधंदे गुजरात बळकावतो, महाराष्ट्राला कंगाल करतो आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते चिडीचूप असतात. विरोध करायचे "धाडस" त्यांना होत नाही.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी "स्वराज्यासाठी" सुरत दोनवेळा लुटली. त्या शिवाजी महाराजांवरील सूड उगवण्यासाठी "महाराष्ट्राला" कंगाल करण्याचे हें "षडयंत्र" भाजपा आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह आखत आहेत का ??? 

ज्या महाराष्ट्राच्या जीवावर आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई च्या जीवावर संपूर्ण भारत चालतो ,जगतो ,त्याच महाराष्ट्राला "कमकुववत" करण्यासाठी, त्याची चिरफाड करण्यासाठी महाराष्ट्राला "ओरबाडण्यासाठी" भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे आणि भाजपा चे नेते उजळ माथ्याने महाराष्ट्रात वावरत आहेत .हा "अन्याय" नाही का .?

ज्या हरियाणा मध्ये भाजपा उमेदवारांना ग्रामीण भागात मतदारांनी प्रवेश दिला नाही,चप्पल घालून त्यांच्या उमेदवारांचे त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यांना चिखलात पायी चालवण्यात आले, इतका "भाजपा क्रोध" जनतेमध्ये आहे. तेथे EVM चा "खेळ झाला हा भाग अलहिदा ! भविष्यात महाराष्ट्रात देखील याची परिणीती अशाच पद्धतीने झाल्यास आश्चर्य वाटू नये .

महाराष्ट्रातील जनतेला भिकारी करून "मतदान" मागणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रातील जनतेने दारावर उभे करता कामा नये. 18 उद्योगधंदे गुजरात ला का ?? मराठी माणसांवर भाजपा चा अन्याय का ??? आम्ही काय "पाप" केले आहे ?? "महागाई" आणि बेरोजगारी. वाढण्याचे कारण काय ?? असे प्रश्न मतदारांनी भाजपाला आणि संबंधित "उमेदवाराला" विचारायला पाहिजेत. अन्यथा भाजपा संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला विकायला मागेपुढे करणार नाही.      

     

         . *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा