Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

*तांबवे येथे दत्तात्रय मारुती माने शेंडगे व सोनाबाई माने शेंडगे यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त संगीत भजन कार्यक्रमाचे संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलूज : मराठा सेवा संघाचे इंजिनिअर उत्तमराव माने व भूमी अभिलेख उपसंचालक अनिल माने साहेब यांचे वडील दत्तात्रय माने शेंडगे व आई सोनाबाई दत्तात्रय माने यांच्या स्मृति दिनानिमित्त दत्तात्रय माने-शेंडगे स्मृती प्रतिष्ठान वाघोली यांच्या वतीने जिजाऊ फार्म तांबवे येथे संगीत भजन या कार्यक्रमाने आयोजन करण्यात आले होते.



यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, रावसाहेब तात्या पराडे, उत्तमराव माने, अनिल माने, दिगंबर माने, सुनील माने, भजनदास मिसाळ, कुंभार गुरुजी, बिबीशन मिले, सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज, दत्तात्रय मारुती माने व सोनाबाई दत्तात्रय माने यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कु. आर्वी व उर्वी अजित माने, पुष्कराज माने, स्वरांजली माने यांनी जिजाऊ वंदना गायली.

तसेच 26 नोव्हेंबर रोजी जे मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले त्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना आणि दत्तात्रय माने व सोनाबाई माने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर मुक्ताई भजनी मंडळ अकलूज महिला भजनी मंडळ वाघोली तसेच टेंभुर्णी चव्हाणवाडी, वाघोली, तांबवे लवंग, खंडाळी, तांदुळवाडी ह्या गावच्या भजनी मंडळानी आपले भजन सादर केले.



पुष्पवृष्टी व आरती झाल्यानंतर सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदरप्रसंगी माजी सीईओ भारत शेंडगे, अमोल माने, अजित माने, योगेश माने, गिरीश माने, राजेंद्र मिसाळ, रामचंद्र मिसाळ, दिलीप सांगडे, विठ्ठल चव्हाण, दीपक इंगळे तसेच सर्व नातेवाईक मंडळी व तांबवे, वाघोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.


दरवर्षी दत्तात्रय माने-शेंडगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सलग वीस वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवून स्मृतिदिन साजरा केला जातो चालू वर्षी संगीत भजन घेऊन स्मृतिदिन साजरा करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा